घरक्रीडाIND vs NZ Kanpur Test : कोच द्रविड यांची ग्रीन पार्क स्टेडियमला...

IND vs NZ Kanpur Test : कोच द्रविड यांची ग्रीन पार्क स्टेडियमला भेट; खेळपट्टी तयार करण्यासाठी दिले ३५००० रूपये

Subscribe

पहिल्या सामन्यात कानपूरच्या खेळपट्टीवर दोन्हीही संघाना फलंदाजी करताना अडचणींचा सामना करावा लागला

भारतीय संघाचे नवनिर्वाचित प्रशिक्षक (coach) राहुल द्रविड हे कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमच्या खेळपट्टीवर नाराज असल्याची चर्चा आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील कानपूर मध्ये झालेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. भारताने दिलेल्या २८४ धावांच्या आव्हांनाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सामन्याच्या शेवटच्या दिवसाअखेर फलंदाजी केली आणि सामना अनिर्णित केला. यानंतर प्रशिक्षक द्रविड यांनी ग्रीन पार्क मैदानाच्या कर्मचाऱ्यांना मैदानाच्या खेळपट्टीसाठी ३५ हजार रूपये दिले. ग्रीन पार्क मैदानावर मैदानाच्या स्टाफच्या टीमचे नेतृत्व शिवकुमार करत होते. द्रविड यांनी ३५ हजार रुपये शिवकुमार यांना दिले.

दरम्यान दोन्ही बाजूंना संतुलित खेळपट्टी बनवण्यासाठी द्रविड यांनी पैसे दिले असल्याचे खुद्द उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने सामन्यानंतर ही माहिती दिली. या खेळपट्टीवर पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी १६ बळी घेतले. तर फिरकीपटूंनी २० बळी घेतले. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्या सामन्यात कानपूरच्या खेळपट्टीवर दोन्हीही संघाना फलंदाजी करताना अडचणींचा सामना करावा लागला.

- Advertisement -

द्रविड यांना त्यांच्या काळातही एक निष्पक्ष आणि मनमोकळा खेळाडू म्हणून ओळखले जायचे. दरम्यान आता कित्येक वर्षांनंतरही ती परिस्थिती बदललेली नाही. द्रविड यांनी मैदानातील स्टाफचे कौतुक केले कारण सध्या अनेक परदेशी संघ स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या खेळपट्ट्या तयार करतात आणि कसोटीचा सामना तीन दिवसांतच संपवतात.

कानपूरच्या मैदानावरील खेळपट्टी चांगली होती. चांगल्या संघाला जगाच्या वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळावे लागते. ऑस्ट्रेलियात बाऊन्स, इंग्लंडमध्ये स्विंग, तर भारतासमोर फिरकीचे मोठे आव्हान आहे. कानपूर कसोटीत खेळपट्टीवर पाचही दिवशी समान पध्दतीने खेळ पहायला मिळाला आणि दोन्ही संघांना जिंकण्याची संधी निर्माण झाली होती. जगातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणायचे असेल तर संघाला प्रत्येक स्थितीत चांगला खेळ करावा लागतो.

- Advertisement -

हे ही वाचा:http://BAN vs PAK : इमरान आणि वकारच्या यादीत हसन अलीचा समावेश;बांगलादेशविरूध्द पटकावले ५ बळी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -