घरक्रीडाBhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; मुलीचा झाला बाबा

Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; मुलीचा झाला बाबा

Subscribe

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. भुवनेश्वर आणि त्याची पत्नी नुपूर नागर यांना मुलगी झाली आहे. नवी दिल्लीच्या दवाखान्यात नुपूरने मुलीला जन्म दिला. तिला मंगळवारीच दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. भुवनेश्वर कुमार नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचा हिस्सा होता. टी-२० विश्वचषकात भुवनेश्वर कुमार खराब फॉर्ममध्ये होता. मात्र न्यूझीलंडविरूध्द झालेल्या टी-२० मालिकेत भुवनेश्वरने शानदार खेळी करत चांगला कमबॅक केला होता. भुवनेश्वर कुमार उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील रहिवासी आहे. माहितीनुसार भुवनेश्वरच्या मुलीचा जन्म बुधवारी सकाळी ९ वाजता झाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi)

- Advertisement -

भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागर हे २३ नोव्हेंबर २०१७ ला विवाहबंधनात अडकले होते. भुवनेश्वर कुमारची पत्नी सध्या दिल्लीतील नोएडा मधील रहिवासी आहे. विश्वचषकामध्ये भुवनेश्वर कुमारकडून निराशाजनक कामगिरी झाली. न्यूझीलंडविरूध्द झालेल्या टी-२० मालिकेत भुवनेश्वरने ३ बळी पटकावले. तर टी-२० विश्वचषकात फक्त पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात त्याचा संघात समावेश नव्हता.

- Advertisement -

भुवनेश्वर कुमारसाठी २०२१ या वर्षात खूप चढ-उतार आले आहेत. याच वर्षी त्याच्या वडिलांनी त्याचा आणि या जगाचा कायमस्वरूपी निरोप घेतला. त्याच्या वडिलांचे मे महिन्यात निधन झाले. यानंतर आयपीएल २०२१ मध्ये देखील तो काही खास कामगिरी करू शकला नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या घरी परीचे आगमन झाल्यानंतर त्याच्या कडून चांगल्या खेळीची अपेक्षा सर्वच चाहत्यांकडून केली जात आहे.


हे ही वाचा: Womens Big Bash League : हरमनप्रीत कौर बनली ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट; हा विक्रम करणारी पहिली भारतीय खेळाडू


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -