IPL 2022 : आयपीएलच्या पुढील हंगामात दिल्ली कोणाला करणार रिटेन?; अश्विनने दिली माहिती

आयपीएलच्या २०२२ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोणाला रिटेन करणार याबाबत फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने माहिती दिली आहे

आयपीएलच्या २०२२ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोणाला रिटेन करणार याबाबत फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने माहिती दिली आहे. पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्याला आणि श्रेयश अय्यरला रिटेन करणार नसल्याचे त्याने संकेत दिले. अश्विनने त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलताना त्याची प्रतिक्रिया दिली. मागील दोन हंगामापासून अश्विन दिल्ली कॅपिटलिसच्या संघाचा हिस्सा आहे. यापूर्वी तो पंजाब किंग्सकडून खेळत होता तर पंजाबच्या संघाचा तो कर्णधार देखील राहिला आहे. अश्विनने त्याला दिल्लीचा संघ रिटेन करणार नसल्याचे सांगताना म्हटले की, “जर मला दिल्लीच्या संघाला रिटेन करायचे असते तर अद्याप मला याबाबत कल्पना दिली असती”.

अश्विनने श्रेयश अय्यर बाबतीत देखील असेच भाष्य केले. श्रेयश अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीच्या संघाने २०२० च्या आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. यानंतर २०२१ च्या आयपीएलच्या पहिल्या सत्रापूर्वी अय्यरच्या खाद्यांला दुखापत झाली त्यामुळे तो जवळपास ६ महिने क्रिकेटपासून लांब राहिला होता. त्याच्या गैरहजेरीत दिल्लीच्या संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपवण्यात आले. दरम्यान आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रात अय्यरचे पुनरागमन झाले तरी देखील संघाचे नेतृत्व पंतकडे होते.

दिल्ली कॅपिटल्स तीनपेक्षा जास्त खेळांडूना रिटेन करणार नाही, यामध्ये ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नॉर्कियाचा समावेश असेल असे अश्विनला वाटत आहे. दरम्यान २०२२ च्या आयपीएलच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघाचा समावेश होणार आहे. त्यामुळे या दोन संघातील एका संघाचा कर्णधार होण्यासाठी अय्यर दिल्लीची साथ सोडू शकतो.

बीसीसीआयने आयपीएल २०२२ च्या लिलावापूर्वी खेळांडूना रिटेन करण्याबाबत केलेल्या नियमावलीनुसार जुने ८ संघ संघातील फक्त ४ खेळांडूना रिटेन करू शकतात. यामध्ये ३ भारतीय खेळाडू आणि १ विदेशी किंवा २ भारतीय आणि २ विदेशी असे असणे गरजेचे आहे.


हे ही वाचा: IND vs NZ Test series : भारतीय संघात के.एल राहुलच्या जागेवर सुर्यकुमार यादव; BCCI ने दिली माहिती