IPL 2022: फिरकीपटू मोईन अली ‘चेन्‍नई’च्या ताफ्यात दाखल; संघात मोठ्या बदलांची शक्यता

चेन्नईविरुद्ध लखनऊ यांच्यातील समान्याकरीता चेन्नईच्या संघात मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच कारण म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात मोईन आलीला संधी मिळणार का? आणि त्याच्यासाठी कोणाला संघाबाहेर काढलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग संघाचा दुसरा सामाना आज लखनऊविरोधात होणार आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्विकारल्यानंतर चेन्नईचा संघ लखनऊविरोधात विजयाच्या शोधात दिसणार आहे. मात्र चेन्नईविरुद्ध लखनऊ यांच्यातील समान्याकरीता चेन्नईच्या संघात मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच कारण म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात मोईन आलीला संधी मिळणार का? आणि त्याच्यासाठी कोणाला संघाबाहेर काढलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

व्हिसाशी संबंधित समस्यांमुळं मोईन अली याला भारतात पोहोचण्यास उशिर झाला. त्यामुळं त्याला कोलकाताविरुद्धाचा पहिला सामना खेळता आला नाही. मात्र, आता त्याच्या उपस्थितीत संघात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पहिला सामना खेळु शकला नसला तरी, दुसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन निश्चित आहे. सध्या संघात न्युझिलंडच्या फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरला स्थान देण्यात आलं असुन त्याच्याजागी मोईनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

मोईन अलीशिवाय संघात इतर कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे. मोईन अलीसाठी सँटनरला वगळले नाही, तर पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरलेल्या डेव्हॉन कॉनवेला बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. चेन्नईचा प्रमुख खेळाडू मोईन अलीनं गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली होती. मोईन हा टॉप ऑर्डरचा फलंदाजही आहे. गेल्या मोसमात त्यानं 15 सामन्यात ३५७ धावा करत ६ विकेट्सही घेतल्या होत्या.

चेन्नईचा संघ आज लखनऊच्या संघाशी भिडणार आहे. दरम्यान, चेन्नई आणि लखनऊ या दोघांनी आपला पहिला सामना गमावला आहे. त्यामुळं आजच्या समान्यात कोण बाजी मारणार आणि गुणतालिकेत आपला गुणांचा श्रीगणेशा कोण करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या पर्वातील बंगळुरूचा पहिला विजय; कोलकाताचा 3 गडी राखून पराभव