घरक्रीडाक्रिकेटमध्ये कर्णधार सर्वात महत्वाचा, प्रशिक्षक नाही - सौरव गांगुली

क्रिकेटमध्ये कर्णधार सर्वात महत्वाचा, प्रशिक्षक नाही – सौरव गांगुली

Subscribe

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते क्रिकेट हा फुटबॉलच्या अगदी विरुद्ध आहे. क्रिकेटमध्ये कर्णधार सर्वात महत्वाचा असतो, प्रशिक्षक नाही.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते क्रिकेट हा फुटबॉलच्या अगदी विरुद्ध आहे. फुटबॉलमध्ये प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची असते पण क्रिकेटचे तसे नाही. क्रिकेटमध्ये जास्त निर्णय हे कर्णधाराला घ्यावे लागतात.

प्रशिक्षकाने मागे राहणे आवश्यक 

सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने खूप चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे एका कार्यक्रमात त्याला कर्णधारपदाबद्दल आणि त्याच्या जबाबदारीबद्दल विचारले असता तो म्हणाला, “क्रिकेटमध्ये कर्णधार सर्वात महत्वाचा असतो. क्रिकेट फुटबॉलच्या अगदी विरुद्ध आहे. अनेक क्रिकेट प्रशिक्षकांना वाटते की ते फुटबॉलप्रमाणे क्रिकेटचा संघही चालवू शकतील. पण तसे होऊ शकत नाही. कारण फुटबॉलमध्ये प्रशिक्षक सर्वात महत्वाचा असतो. पण क्रिकेटमध्ये कर्णधारच सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे प्रशिक्षकाने मागे राहणे आवश्यक असते.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -