(Cricket Match) इस्लामाबाद : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून यजमान पाकिस्तान संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. एकही सामना न जिंकलेल्या पाकिस्तानी संघाच्या खात्यात पावसामुळे एक गुण जमा झाला. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर बांगलादेशबरोबर पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण मिळाला. अशातच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाबद्दल एक अजब घटना घडली आहे. या सामन्यात तीन बॉलमध्ये चारजण बाद झाले. याशिवाय, गोलदाजाने हॅट्-ट्रिकही नोंदवली! (Saud Shakeel is out due to time out)
पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी रावळपिंडी येथे झालेल्या देशांतर्गत प्रेसिडेंट्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फलंदाज सौद शकील सहभागी झाला. त्यातील एका सामन्यात तो अजब पद्धतीने बाद झाल्याची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये झाली. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडून पाचव्या क्रमांकावर खेळणारा शकील वेळेवर फलंदाजीसाठी न आल्याने त्याला टाइमआऊट घोषित करण्यात आले.
Saud Shakeel became the first Pakistani and seventh player overall to get Timed-Out in first-class cricket after falling asleep during the ongoing President’s Trophy Final 😴💤⏰ pic.twitter.com/Ea0h2zUVW7
— Circle of Cricket (@circleofcricket) March 6, 2025
पाकिस्तान टेलिव्हिजन संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शहजादने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा कर्णधार ओमर अमीन आणि फवाद आलम यांना सलग दोन चेंडूंवर बाद केले. यानंतर सौद शकील मैदानावर आला, पण त्याला तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने त्याच्या टाइमआऊटचे अपील केले. अंपायरने ते मान्य करून त्याला बाद घोषित केले. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मीळ घटना आहे. अशा प्रकारे बाद होणारा तो पहिला पाकिस्तानी फलंदाज आहे. फलंदाज निर्धारित वेळेत खेळपट्टीवर पोहोचला नाही तर, त्याला टाइमआऊट दिले जाऊ शकते.
याबाबतच्या वृत्तांनुसार सौद शकील ड्रेसिंग रूममध्ये झोपला होता. त्याच वेळी, दोन फलंदाज सलग दोन चेंडूंवर बाद झाले. अशा परिस्थितीत त्याला खेळपट्टीवर यायला उशीर झाला. तिसऱ्या चेंडू टाकण्यापूर्वी शकीलला टाइमआऊट घोषित करण्यात आले आणि पुढच्या चेंडूवर मोहम्मद शहजादला पुन्हा विकेट मिळाली. अशाप्रकारे, त्याने 3 चेंडूत चार विकेट घेतल्या. शकीलच्या बाद झाल्यानंतर, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध अँजेलो मॅथ्यूजला टाईमआउट केल्याचा उल्लेखही झाला. शकील अशा प्रकारे बाद झाल्यानंतर, 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाइमआऊट घोषित केल्याची चर्चा रंगली होती.
हेही वाचा – Anil Parab : मुंबईचे भाषिक तुकडे पाडण्याचा आरएसएसचा छुपा अजेंडा, अनिल परब कडाडले