Eco friendly bappa Competition
घर क्रीडा भारत - पाकिस्तान यांच्यात लवकरच क्रिकेट सामने? पाक दौऱ्यावरून परतलेल्या BCCI अध्यक्षांना विश्वास

भारत – पाकिस्तान यांच्यात लवकरच क्रिकेट सामने? पाक दौऱ्यावरून परतलेल्या BCCI अध्यक्षांना विश्वास

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या दशकापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) स्पर्धांपुरते मर्यादित आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका कधी होणार, याची क्रीडा चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लवकरच क्रिकेट सामने होतील, असा विश्वास बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binney) यांनी व्यक्त केला आहे. (Cricket matches between India and Pakistan soon Confidence of BCCI President who returned from Pakistan tour)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निमंत्रणावरून रॉजर बिन्नी आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून आशिया चषक सामना पाहून भारतात परतले. पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर बिन्नी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी होईल, यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, बीसीसीआय यासंदर्भात काहीही बोलू शकत नाही. यासंदर्भात निर्णय भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सरकारांवर अवलंबून आहे. परंतु आम्हाला प्रतीक्षा आहे आणि आशा आहे की, हे लवकरच घडेल. कारण पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी भारतात येत आहे, असे रॉजय बिन्नी यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Ind vs pak : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस निश्चित; कधी ते वाचा?

पाकिस्तानकडून मिळालेल्या आदरातिथ्यावर बोलताना रॉजर बिन्नी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये आमची खूप चांगली घेतली. आमची खूप छान बैठकही झाली. क्रिकेट पाहणे आणि त्याच्याशी बसून चर्चा करणे हा मुख्य अजेंडा आमच्या दौऱ्याचा होता. पाकिस्तानने आम्हाला चांगली वागणूक दिली. आम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही, यासाठी ते शक्य तेवढे प्रयत्न करत होते, असे ते म्हणाले.

राजीव शुल्का काय म्हणाले?

- Advertisement -

राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कौतुक करताना म्हटले की, बैठक चांगली पार पडली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आमची चांगली काळजी घेतली. सुरक्षा उत्तम होती, सर्व व्यवस्था सुरेख होती. दोन्ही देशांच्या क्रिकेटसाठी हा सदिच्छा दौरा होता, जो चांगला पार पडला. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत. बीसीसीआयचे सर्व एसीसी सदस्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे आम्ही पाकिस्तान दौरा केला. आम्ही श्रीलंकेलाही भेट दिली आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – बुढ्ढा होगा… 43 वर्षीय रोहन बोपन्नाने गाठली टेनिस ग्रॅंडस्लॅमची अंतिम फेरी; आता लक्ष्य विजयाचे

भारत-पाकिस्तान सामना होणार?

दरम्यान, बीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांनी मागील 17 वर्षात पाकिस्तानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. भारत आणि पाकिस्तान सध्या श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेत व्यस्त असून 10 सप्टेंबर रोजी पुन्हा एकाद सुपर-4 मध्ये भिडणार आहेत. यानंतर 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे बहुप्रतिक्षित विश्वचषक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे दोन दिग्गज पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. पण यानंतर क्रीडा चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आणखी एका आयसीसी स्पर्धेची किंवा आशिया चषकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु रॉजर बिन्नी यांच्या म्हणन्यानुसार, दोन्ही सरकारने सहमती दर्शविल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहता येणार आहे.

भारत पाकिस्तानला शेवटचा कधी गेला?

भारताने शेवटची वेळ 2006 मध्ये द्विपक्षीय दौऱ्यासाठी पाकिस्तानला भेट दिली होती. 2008 मध्ये आशिया चषकादरम्यान भारत शेवटचा पाकिस्तानला गेला होता. 2012 मध्ये लहान पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी पाकिस्तानने भारताला भेट दिली असली, तरी गेल्या दशकापासून दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध केवळ ICC आणि ACC स्पर्धांपुरते मर्यादित आहेत.

- Advertisment -