घरक्रीडाविदर्भाच्या 'या' खेळाडूने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

विदर्भाच्या ‘या’ खेळाडूने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

Subscribe

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सचिन म्हणून ओळखला जाणारा विदर्भाचा बॅट्समन वसीम जाफरने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

दरवर्षी अनेक खेळाडू मैदानावर आपली कारकीर्द सुरू करतात. यातील अनेक जण यशस्‍वी होऊन निवृत्ती घेतात. असाच एका प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सचिन म्हणून ओळखला जाणारा विदर्भाचा बॅट्समन वसीम जाफरने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी ”देशाचे प्रतिनिधीत्व करून मी माझ्या वडिलांच स्वप्न पूर्ण केले आहे आणि यासाठी मला अभिमान वाटतो” असे तो म्हणाला. तसेच त्याने आपल्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. वसीम जाफर आपला अखेरचा आतंरराष्ट्रीय सामना एप्रिल २००८ मध्ये साऊथ आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. वसीम जाफरने विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

- Advertisement -

“सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग आणि धोनी यांसारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे माझ्यासाठी फार मोठी बाब आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, झाहीर खान, अमोल मुजुमदार आणि निलेश कुलकर्णी यांच्यासारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे माझ्यासाठी कायमचं खास राहिल,” असेही तो म्हणाला.

रणजी सामन्यांमध्ये धावांचा विक्रम

वसिम जाफरने मुंबईकडून रणजी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो विदर्भाच्या संघात दाखल झाला. रणजी करंडकाच्या आजवरच्या इतिहासात दीडशे सामने खेळणारा जाफर हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. जाफरनं आजवरच्या रणजी कारकीर्दीत १५० सामन्यात ११ हजार ७७५ धावांचा रतीब घातला आहे.

- Advertisement -

प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक

जाफरनं प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावत भारतीय कसोटी संघात प्रवेश मिळवला होता. तो फेब्रुवारी २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. कसोटी सामन्यांमध्ये पहिले शतक ठोकण्यासाठी त्याला सहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर कसोटी सामन्यात त्यानं दुहेरी शतकही झळकावले होतं.


हेही वाचा – करोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्याची शक्यता – राजेश टोपे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -