1947 सालापासून ‘मांकडिंग’ असताना आता वाद का?

क्रिकेट खेळताना अनेकदा खेळाडूंमध्ये वाद होताना पाहायला मिळतात. सामन्यावेळी बऱ्याचदा क्रिकेटच्या नियमांमुळे खेळाडूंमधील वाद टोकाला जातो. सध्या 'मांकडिंग'चा मुद्दा चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. या मांकडिंगच्या नियमावलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) मान्यता दिली आहे. तसा हा नियम क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यापासूनच आहे.

क्रिकेट खेळताना अनेकदा खेळाडूंमध्ये वाद होताना पाहायला मिळतात. सामन्यावेळी बऱ्याचदा क्रिकेटच्या नियमांमुळे खेळाडूंमधील वाद टोकाला जातो. सध्या ‘मांकडिंग’चा मुद्दा चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. या मांकडिंगच्या नियमावलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) मान्यता दिली आहे. तसा हा नियम क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यापासूनच आहे. पहिल्या वर्ल्डकपपासून मांकडिंगचा हा नियम क्रिकेटमध्ये वापरला जात आहे. मात्र, मांकडिंगला आयसीसीने मान्यता दिली असतानाही अद्याप खेळाडूंनी हा नियमाला मान्यता न दिल्याचे दिसत आहे.

मांकडिंगने एखादा फलंदाज बाद झाल्यास विरुद्ध संघातील खेळाडू संबंधीत त्या विकेटला चिटींग असे समजतात. त्यामुळे दोन संघांमध्ये वाद होतात. परिणामी अंपायरला प्रत्येकवेळी थर्ड-अंपायरची मदत घ्यावी लागते. त्यानंतर थर्ड अंपायरच्या अंतिम निर्णयानंतर खेळाडूला धावबाद ठरवले जाते. मात्र, त्यानंतरही संबंधित खेळाडू नाराजी व्यक्त करताना दिसतात.

नुकताच इंग्लंड महिला आणि भारत महिला यांच्या झालेल्या टी-20 मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघातील गोलंदाज दीप्ती शर्माने इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला धावबाद केले. चार्ली डीनला बाद करत भारताने मालिकेत विजय मिळवला. मात्र, मांकडींग नियमानुसार बाद केल्याने दीप्ती शर्मावर मोठ्या प्रमाणात टीका केल्या जात आहेत. यावेळी इंग्लंडची कर्णधार हिदर नाइट हिने दीप्ती शर्माना खोटारडी असल्याचे म्हटले होते.

नेमका वाद काय ?

हा वाद असा होती की, दीप्ती शर्माने मांकडिंगच्या नियमानुसार इंग्लंडच्या चार्ली डीनला बाद करण्यापूर्वी वॉर्निंग दिली होती असे बोलले जात आहे. त्यानंतरही नॉन स्ट्रायकर असलेली चार्ली डीन क्रिज सोडून धावली. त्यामुळे दीप्ती शर्माने तिला मांकडिंगच्या नियमानुसार धावबाद केले. परंतु, दीप्ती शर्माच्या या म्हणण्याला इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटने खोटं म्हटले आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा जुन्या नियमावरून नव्या वादाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंड आणि भारत कर्णधारांमध्ये वादविवाद

इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यानंतर इंग्लंडची कर्णधार एमी जोन्सला या धावबादबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तिने भारताच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत “सामना अशाप्रकारे संपणे दु:खद आहे. याबद्दल प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. मी या नियमाची चाहती नाही. भारतीय संघ याकडे कसे पाहतो हे मला माहीत नाही”, असे म्हटले.

त्यानंतर हरमनप्रीत कौरला या विकेट संदर्भात विचारण्यात आले. मात्र, ती उत्तर देण्यास टाळाटाळ करत होती. पण तिला त्या धावबादसंदर्भात पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने “मला वाटले होते की तुम्ही पहिल्या ९ विकेट्सबद्दल विचाराल कारण ते घेणेही सोपे नव्हते. आम्ही काही चुक केली आहे असे मला वाटत नाही. मुळात यावरून क्रिकेटपटू म्हणून आपण किती सतर्क आहोत, हे दिसून येते. मी माझ्या खेळाडूला पाठिंबा देईन”, असे म्हटले.

सध्या भारताची गोलंदाज दीप्ती शर्माने इंग्लंडच्या शार्ली डीन हिला धावबाद केले. त्यानंतर नव्याने ‘मांकडिंग’च्या चर्चेने गती घेतली असून अनेक तर्क-वितर्क नव्याने लढवले जाऊ लागले. मात्र, काही मांकडिंग या नियमाला आयसीसीची मान्यता असताना त्यावर चर्चा करणे म्हणजे अधिकृत नियमांवर अविश्वास दाखवल्या सारखे…

दरम्यान, मांकडिंग नियमाने नॉन स्ट्रायकरला बाद करणे हा काही नवा वाद नाही. याआधीही इंडियन प्रीमियर लीगमध्ये हा वाद पाहायला मिळाला होता. 2019 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातल्या सामन्यात अश्विन व जोस यांच्यात मंकडिंगवरून वाद झाला होता. आर अश्विन पंजाब किंग्सकडून खेळत होता आणि जोस राजस्थानचा सदस्य होता. पंजाबच्या 185 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 2 बाद 108 धावा केल्या होत्या आणि जोस 69 धावांवर खेळत होता. तेव्हा अश्विननं त्याला मंकडिंग करून धावबाद केले आणि त्यावरून मोठा वाद झाला होता. राजस्थानने हा सामना 14 धावांनी गमावला होता.

काय सांगतो नियम ?

क्रिकेटविश्वात नॉन-स्ट्रायकर फलंदाजाने, गोलंदाजाने चेंडू हातातून सोडण्यापूर्वी क्रीझमध्ये थांबणे आवश्यक असते. फलंदाज क्रीझमध्ये थांबत नसेल, तर त्याला धावबाद करण्याचा गोलंदाजाला अधिकार आहे.

सुरवातीला क्रिकेटच्या नियमावलीत नियम 41 अनुसार अशा धावबाद कृतीस अनफेअर प्ले मानले जात होते. पुढे नियम 41.16 नुसार नॉन-स्ट्रायकरचा फलंदाज धावचीत असे मानले जाऊ लागले.

नुकताच क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) या नियमात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांनी अशा पद्धतीने बाद होण्याला सर्वसामान्य पद्धत म्हणून मान्यता दिली. त्यांनी अयोग्य खेळाचा नियम 41 वगळून धावबाद हा नवा नियम 38 तयार केला. हा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

काय असते मांकडिंग ?

भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू ‘विनू मांकड’ यांच्या नावावरून ‘मांकडिंग’ हा शब्द प्रचलित झाला आहे. भारतीय संघ 1947 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळत होता. तेव्हा मांकड यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बिल ब्राऊनला चेंडू टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर एंडला आधी सूचना देऊन एकदा नव्हे, तर दोनदा बाद केले होते.

त्यावेळी ‘विनू मांकड’ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र आपण क्रीझ सोडून पुढे न जाण्याचा इशारा फलंदाजाला दिला होता असे मांकड यांनी सांगितले आणि ते खरेही होते. त्यावेळी ‘आयसीसी’च्या नियमावलीत या पद्धतीने फलंदाज बाद झाल्यास ‘अनफेअर प्ले’ म्हणून म्हटले गेले. त्यानंतर क्रिकेटविश्वात ही पद्धत ‘मांकडिंग’ म्हणून रूढ झाली.


हेही वाचा – IND-W vs ENG-W : ‘हा आमचा खिलाडूपणा…’; हरमनप्रीत कौरचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर