धोनी साक्षीला म्हणाला ‘रुममध्येही नीटच कपडे घालायचे’!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी साक्षीला सांगतो व्यवस्थित कपडे घाल.

महेंद्रसिंग धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वोत्तम कर्णधारमधील एक आहे. तो नेहमी आपल्या संघातील खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा आणि काही गोष्टी देखील शेअर करत असतो. दरम्यान, आतापर्यंत बर्‍याच खेळाडूंनी खुलासा केला आहे की ‘आयपीएल दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीच्या हॉटेलच्या रूमचा दरवाजा नेहमीच खुला असतो. यावर साक्षी धोनीने रविवारी एका इन्स्टाग्रामवर घेण्यात आलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, ‘आयपीएल दरम्यान धोनीने मला स्पष्ट सांगितले होते की, खोलीचा दरवाजा नेहमीच खुला राहणार आहे. त्यामुळे तू व्यवस्थितच कपडे घालत जा’.

व्यवस्थित कपडे घालण्याचा दिला सल्ला

चेन्नई सुपर किंग्सच्या लाइव्ह मुलाखतीत साक्षीने सांगितले आहे की, ‘धोनीने मला मॅचच्या दौऱ्यावर असताना व्यवस्थित कपडे घालण्याचे बजावले आहे. तसेच या दरम्यान नाईट ड्रेस देखील घालण्यास बंदी घातली आहे. त्यांनी सांगितले की, आपल्या रुमचा दरवाजा नेहमी खुला राहणार आहे. त्यामुळे तू व्यवस्थितच कपडे घालणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत साक्षीला राग आला नाही कारण तिला धोनी आणि त्याच्या मित्रांचे नाते कळले आहे. विशेष म्हणजे धोनीच्या संघातील त्याचे मित्र रात्री २ ते ३ वाजेपर्यंत धोनीच्या रुममध्येच असतात. तर काही जण रात्री येऊन सकाळच्या नाश्ताची वेळ झाली तरी रुममध्येच जात नाहीत’, त्यामुळे धोनी आपल्या रुमचा दरवाजा लावत नाही.

म्हणून लागली होती डुलकी

गेल्या वर्षी धोनी आणि साक्षीचा एअरपोर्टवरचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये साक्षी आणि धोनी झोपले होते. याबाबत देखील तिने खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, ‘त्या रात्री देखील त्यांचे मित्र पूर्ण रात्र रुममध्ये होते. त्यामुळे झोप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे एअरपोर्टवर डुलकी लागली होती’.


हेही वाचा – हार्दिक-नताशाने दिली गुड न्यूज; सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर