घरक्रीडाऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असावं - लारा

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असावं – लारा

Subscribe

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याच्या मते ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची गरज आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा अशी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंची मागणी करत आहे.

गेल्या काही काळापासून अनेक क्रिकेटपटू आणि काही क्रिकेट बोर्ड हे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी करत आहेत. आता या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराचा समावेश झाला आहे. त्याच्यामते जर क्रिकेटचा अधिक प्रसार करायचा असेल तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असणे आवश्यक आहे.

टी-२० क्रिकेट सर्वोत्तम उपाय 

ब्रायन लारा क्रिकेट आणि ऑलिम्पिकविषयी म्हणाला, “मला वाटते की आता क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची वेळ आली आहे. टी-२० चा सामना अवघ्या ३ तासांत संपतो. त्यामुळे क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये नसण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.

क्रिकेटचा प्रसार होणे आवश्यक  

“आयसीसीचा क्रिकेटचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश असला पाहिजे आणि ते टी-२० क्रिकेटमुळे शक्य होऊ शकते. जे देश आता क्रिकेट खेळायला लागले ते आपोआपच टी-२० क्रिकेटकडे आकर्षित होतात. याचे कारण म्हणजे टी-२० क्रिकेट सर्वात मनोरंजक आहे. तर कसोटी क्रिकेटसाठी चांगले खेळाडू मोठया प्रमाणावर लागतात. ते नव्या संघाना शक्य नसते.”

टी-२० मुळे क्रिकेटमुळे घडलाय बदल

टी-२० क्रिकेटमुळे घडलेल्या बदलांविषयी लारा म्हणाला, “माझ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मी २५ एक एकदिवसीय सामने खेळलो, ज्यामुळे मला माझ्या खेळाच्या आक्रमक शैलीची मदत मिळाली. जर मी सध्या क्रिकेट खेळत असतो तर टी-२० मुळे माझा खेळ अजून आक्रमक झाला असता. पण त्यामुळे माझी कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता कमी नसती असे मला वाटते. टी-२० मुळे कसोटी क्रिकेटमध्ये अधिकाधिक निकाल मिळायला सुरुवात झाली आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -