घरक्रीडापहाड जैसी भूल

पहाड जैसी भूल

Subscribe

क्रिकेटला जन्टलमन्स गेम असे म्हटले जाते, परंतु अलिकडे हा खेळ तसा राहिलेला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात याला बरीच कारणे आहेत. कुठल्याही खेळात नियम झाल्यास कठोर कारवाई अपेक्षित असते अन् ते योग्यच आहे. परंतु निर्णय देणारे पक्षपातीपणा करू लागले (अजाणतेपणी) तर मात्र रंगाचा बेरंग होऊ शकतो. वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धत सर्वोत्तम पंचांची निवड होणे अपेक्षित व अपरिहार्य आहे. ट्रेंड ब्रिज, नॉटिंगहॅमवर झालेल्या ऑस्ट्रेलिया-विंडीज या सामन्यात पंचांचा पक्षपातीपणा वारंवार दिसून आले. त्यांच्या या गफलतींचा फटका कांगारूंपेक्षा विंडीजला बसला. कार्लोस ब्रेथवेटने पंचांच्या या चुकीच्या निर्णयावर भाष्य केले आहे. पंचांच्या निर्णयावर भाष्य केल्यामुळे मला दंड होईल किंवा कसे हे ठाऊक नाही. पंचांची कामगिरी निराशाजनक होती अशा शब्दांत ब्रेथवेटने आपल्या भावना प्रगट केल्या. आयसीसी आचारसंहितेनुसार ब्रेथवेटवर कारवाई होण्याची शक्यता आहे. परंतु, क्रिकेटरसिकांच्या मनातही पंचांच्या निर्णयाबाबत नाराजीची भावना होती.

ख्रिस गेल हा क्रिकेट जगतातील तडाखेबंद फलंदाज. षटकार ठोकणे हा तर जणू त्याचा जन्मसिद्ध हक्कच. पळून धावा करण्यापेक्षा चेंडूला तडी देण्यातच धन्यता मानणारा विंडीजचा हा हरफनमौला खेळाडू. ऑस्ट्रेलियाच्या २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गेलसारखा फलंदाज लवकर गमावणे तोदेखील चुकीच्या निर्णयामुळे हे सारे क्लेशदायकच. १८० धावा फटकावून काढण्याची ताकद गेलच्या बॅटमध्ये निश्चितच होती. असे नमूद करतून ब्रेथवेट म्हणाला, पंच त्यांची भूमिका बजावतात त्यांच्या रितीने ते आपली भूमिका पार पाडतात. खेळाडूदेखील प्रयत्नांची शिकस्त करतात. खेळाडू आणि पंच यांच्यात संघर्ष नसतो अशी पुस्तीही त्याने जोडली.

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया-विंडीज लढतीत वाईडची खैरात झाली. ३५ पैकी २४ वाईड तर विंडीजचेच. नोबॉलबाबतही पंचांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाकडे कानाडोळा केला. मिचेल स्टार्कने नोबॉल टाकूनही पंच ख्रिस गॅफनी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची जबर किंमत गेल तसेच विंडीजला मोजावी लागली. स्टार्कचा नोबॉल दिला असता तर पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाली असते. पंचांचा हलगर्जीपणा विंडीजला नडला.क्रिकेटमध्ये डीआरएसचा वापर करण्यात येतो. तंत्रज्ञांची मदत घेण्यात काहीच गैर नाही. मानवी चुका टाळून अचूक निर्णय घेणे कधीही हितावहच. थर्ड अंपायरने नोबॉलवर लक्ष केंद्रीत करून मैदानातील पंच चुका करत असेल तर वॉकी-टॉकीवर संपर्क साधून निश्चितच त्या निदर्शनास आणल्यास मानवी चुकांचे प्रमाण कमी होऊन कटू प्रसंग टाळता येतील. यावरून एक आठवणआली ती इंग्लंडचे नामवंत, दिवंगत पंच डेव्हिड शेफर्ड यांची. पाक गोलंदाज नो-बॉ टाकत असतानाही शेफर्ड यांच्या नजरेतून ती बाब सुटावी याचेच आश्चर्य वाटते. टीव्ही समालोचकांनी यावर टिपणीही केली. पण शेफर्ड यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी पंचांकडू चूक झाली होती. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणार्‍या खेळाडूंना आयसीसी दंड ठोठावते. निलंबनही करते. परंतु पंचांच्या चुकीच्या निर्णयाची किंमत संघाला मोजावी लागते. पंचांवर कारवाई लगेच होत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या जमान्यातही मानवी चुका टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर होणे श्रेयस्कर ठरले.

विंडीजचा माजी तेज गोलंदाज तसेच आता समालोचकाची भूमिका बजावणार्‍या मायकेल होल्डिंगने पंचांच्या खराब कामगिरीवर ताशेरे ओढले आहेत. ख्रिस गॅफनी, रूचिला पलियागुरगे या पगंच जोडगोळीवर टीका केली असून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दडपणाला पंच बळी ठरले असे म्हटले आहे. एखादे अपील ग्राह्य, पण सतत तीन-चारवेळा अपील केले जाते. पंचांवर दडपण आणून निर्णय आपल्या बाजूने मिळविण्याचा हा प्रकार वाईटच. मायकेल होल्डिंग हे विंडीज तोफखान्यातील यजमान बिनीचे तेज गोलंदाज १९८० दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात पंचांच्या निर्णयावर चीड व्यक्त करताना स्टम्पवर लाथ मारल्याचे छायाचित्र फारच गाजले होते. होल्डिंगच्या तुलनेत विंडीजचा कर्णधार, तेज गोलंदाज जेसन होल्डरचा संयम वाखाणण्याजोगाच. होल्डर म्हणाला, दुर्दैवाने बहुतांशी निर्णय आमच्या विरुद्धच गेले. पंचांकडून चुका होऊ शकतात हे मान्य, पण मला काही वादात पडायचे नाही. आयसीसीने या प्रकारांना वेळीच आवर घालायला हवा. अन्यथा सामान्यांचा निकालच धोकादायक ठरू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -