घरक्रीडाकोण किती पाण्यात ?

कोण किती पाण्यात ?

Subscribe

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया

विश्वचषक स्पर्धा सुरू होवून आता आठवडा लोटला आहे. आपला साऊथ आफ्रिकेविरूद्धचा पहिलाच सामना भारतीय संघाने जिंकून स्पर्धेची सुरूवात विजयाने केली.परंतु,आता भारतीय संघाची खरी कसोटी आहे.कारण आता लढत आहे ती गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी. या सामन्यावरच सार्‍या क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. कारण विश्वचषक स्पर्धेचे विजेते म्हणून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार आहेत.

सध्या तरी या सामन्याचे संभाव्य विजेते म्हणून टीम इंडियाला पसंती असली तरी ऑस्ट्रेलियाचा संघही बलाढ्य आहे हे नाकारून चालणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. विंडीजविरोधात ४ बाद ३८ धावा अशी स्थिती झाली असतानादेखील कांगारुंनी चिवट खेळी करत २८८ धावांचे आव्हान उभे केले होते. त्यानंतर गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करत कांगारुंनी विंडीजवर १५ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंमध्ये ऐन मोक्याची क्षणी सामना बदलण्याची क्षमता आहे. भारतीय संघाकडे चार अष्टपैलू खेळाडू असून त्यांच्यामुळे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बळकट झाले आहे. तर, भारतीय फिरकीपटू विरुद्ध संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत बाद करत आहेत. ऑस्ट्रेलियन संघाच्या कोणत्याही डावपेचाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता टीम इंडियाकडे आहे.

- Advertisement -

विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका झाल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियातील मालिका भारताने आणि भारतातील मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. दोन्ही संघांतील खेळाडू सामना जिंकण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करत असल्यामुळे सामने रंगतदार झाले आहेत. त्यामुळे आता रविवारी होणारी लढतही जोरदार होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सर्वावर पाऊस पाणी फेरणार नाही एवढीच अपेक्षा आहे. शुक्रवारी लंडनमध्ये आलेल्या पावसामुळे भारतीय संघाला सराव करता आला नाही. त्यामुळे रविवारी पावसाचा मूड काय असेल यावर सर्व अवलंबून असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -