Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा टी-20 विश्वचषकासीठी हार्दिकसारखा खेळाडू भारतीय संघात हवाच - हरभजन सिंह

टी-20 विश्वचषकासीठी हार्दिकसारखा खेळाडू भारतीय संघात हवाच – हरभजन सिंह

Subscribe

आयपीएल क्रीकेट सामन्यांमध्ये यावेळी हैदराबाद संघासमोर गुजरात टायटन्स संघाचे आव्हान असणार आहे. गुजरात संघाटने कर्णधार हार्दिकच्या नेतृत्वामध्ये या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने हार्दिकची स्तुती केली आहे. तो स्टार स्पोर्ट्सच्या CRICKET LIVE कार्यक्रमात बोलत होता.

यावेळच्या आयपीएल हंगामात 8 च्याजागी 10 संघामध्ये सामने खेळवले जात आहेत. नव्याने सामिल झालेल्या गुजरात आणि लखनौ संघानी चांगली कामगिरी सुरु ठेवली आहे. गुजरात संघाने आतापर्यंत तीन पैकी तीन सामने जिंकल्याने त्यांची विशेष स्तुती होत आहे. यामुळे 2022 च्या टी-20 विश्वचषकात हार्दिकसारखा खेळाडू भारतीय संघात असायला हवा, अशा शब्दात हार्दिकचे हरभजन सिंहने कौतुक केले आहे. हार्दिक गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. आपल्या फलंदाजीची छाप सोडतना त्यांने गोलंदाजी देखील केली आहे. ही दिलासादायक गोष्ट असल्याचे हरभजन सिंहने म्हटले आहे.

- Advertisement -

विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे सध्या पार पडणाऱ्या आयपीएलसह सर्वच स्पर्धांमधून या विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार हे नक्की केले जाणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -