घरक्रीडाहार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड म्हणते, 'हा तो नव्हेच!'

हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड म्हणते, ‘हा तो नव्हेच!’

Subscribe

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने स्त्रियांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर पांड्याची एक्स गर्लफ्रेंड एली अवराम आणि इशा गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हार्दिकच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये स्त्रियांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री एली अवरामने प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा हार्दिक तो नाही, ज्याला मी ओळखते’, असे एली म्हणाली आहे. एली अवराम ही एका पुरस्कार सोहळ्याला आली होती. त्यावेळी तिला हार्दिक पांड्यांच्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारला गेला. तेव्हा ती म्हणाली, ‘मी नुकतीच विदेशातून भारतात आली. मला काही पत्रकारांनी याबाबतीत प्रश्न विचारले. मी देशाबाहेर होते, त्यामुळे मला याविषयी कल्पना नव्हती. परंतु, नंतर जेव्हा मला हा सगळा प्रकार कळला, तेव्हा मला फार वाईट वाटलं.’

नेमकं काय म्हणाली एली अवराम?

एली अवराम म्हणाली की, ‘हा सगळा प्रकार मला लक्षात आला, तेव्हा माझ्या मनाने मला सांगितले की, हा हार्दिक तो नाही, ज्याला मी ओळखते. तरीही, मला याबाबत बरं वाटलं की, लोक पुढे येऊन बोलले, त्याच्यावर टीका केली. लोकांनी या विचारसरणीचा विरोध केला’. यापुढे जाऊन ती म्हणाली की, ‘आता मी जे काही वर्तमान पत्रांमध्ये वाचत आहे, त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की, जेव्हा तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, तेव्हा त्या गोष्टीची जाणीव असणे फार महत्त्वाचे आहे. कारण पुढची येणारी नवीन पिढी तुमचे अनुसर करणार असते’.

- Advertisement -

‘कोण हार्दिक?’ – इशा गुप्ता

हार्दिक पांड्याची दुसरी एक्स गर्लफ्रेंड इशा गुप्ताला याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता तिने आपण हार्दिकला ओळखत नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, ‘कोणी सांगितलं तुम्हाला की, हार्दीक माझा मित्र आहे?’ पुरुषांची स्त्रियांसोबत बरोबरी करता येणार नाही. पुरुषांपेक्षा आम्ही नेहमीच चांगल्या आहोत. मला कुणाचे मन दुखावयाचे नाही. पण, तुम्ही मुलीला जन्म का देतात? दरमहिन्यात स्त्रिला पाच दिवस मासिक माळीचा सामना करावा लागतो. तरीही ती उभी राहते, नृत्य करते, ऑफिसला जाते आणि आपल्या मुलांची काळजी घेते’. यापुढे ती म्हणते की, ‘मला कुणाच्याही बदल वाईट बोलायचे नाही. परंतु, जर तुमच्या कुटुंबाला या गोष्टीची जाणीव नसेल, तर नसू द्या. पण, ही बाब माणूसकीला साजेशी नाही.’

हार्दिक पांड्यावर निलंबणाची कारवाई

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने स्त्रियांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर हार्दिकला सोशल मीडियावर नेटीजन्सनी चांगलेच झोडपले होते. याप्रकरणी बीसीसीआयने देखील हार्दिक पांड्यावर निलंबणाची कारवाई केली. या कार्यक्रमामध्ये हार्दिक सोबत क्रिकेटर लोकेश राहुल देखील होता. त्यामुळे लोकेश राहुलवरही बीसीसीआयने निलंबणाची कारवाई केली. त्यामुळे दोघांना ऑस्ट्रेलियातून माघारी बोलवण्यात होते. याप्रकरणी चौकशी संपेपर्यंत त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -