Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यात सापडले, पोलिसांनी काही तासांत घेतला शोध

क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यात सापडले, पोलिसांनी काही तासांत घेतला शोध

Subscribe

पुणे : भारतीय क्रिकेटर केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव सोमवारी (27 मार्च) सकाळी बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी पुणे शहरातील अलंकार पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली केल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांच्या शोधमोहिमेला यश आले असून 75 वर्षीय महादेव जाधव मुंढवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

केदार जाधव यांनी दाखल केलेल्या हरवल्याच्या तक्रारीनुसार महादेव जाधव हे पुणे शहरातील कोथरुड भागातील रहिवासी आहेत. त्यांना स्मृतीभंशाचा त्रास असल्यामुळे सकाळी ते कुटुंबातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. दाखल केलेल्या तक्रारीनुसार महादेव जाधव यांची उंची 5 फूट 6 इंच असून त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला शस्त्रक्रियेची खूण आहे. त्यांनी पांढरा शर्ट, राखाडी पँट, काळी चप्पल आणि मोजे घातले होते.

- Advertisement -

महादेव जाधव हे मराठी बोलत असून त्यांनी उजव्या हाताच्या बोटात सोन्याच्या दोन अंगठ्या घातल्या होत्या. त्याच्याकडे मोबाईल फोन नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचण येत होती. 38 वर्षीय केदार जाधव यानेही यासंदर्भात त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वडिलांचा फोटो आणि त्याचा फोन नंबर शेअर केला होता.

या संपूर्ण प्रकरणात अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने महादेव जाधव यांचा शोध सुरू केला. महादेव जाधव यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ पुणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्याने केले होते.

- Advertisement -

केदार जाधव काही महिन्यांपूर्वी अडकला होता अडचणीत
महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या केदार जाधवने काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या रणजी स्पर्धेत आसाम विरुद्ध अप्रतिम द्विशतक झळकावले होते. ही स्पर्धा सुरू असताना त्याने खाजगी कारण देत महाराष्ट्र वि. तामिळनाडू रणजी सामना अर्ध्यावरती सोडून बाहेर पडला होता. यानंतर तो बारामती येथे एका कार्यक्रमात दिसून आला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत केदार दिसून आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी याबाबत बीसीसीआयकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी कितीही मोठा खेळाडू असला तरी असे खोट कारण देऊन स्पर्धेतून बाहेर पडणे चुकीचे आहे. असे करायचे असल्यास क्रिकेट सोडून घरी बसावे, हेमंत पाटील म्हणाले होते.

केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय करिअर
केदार जाधवने श्रीलंकेविरुद्ध 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 73 एकदिवसीय सामने खेळताना 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 101.60 राहिला. केदारने एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत.
याशिवाय केदार जाधवने आपल्या फिरकीची जादू दाखवत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2015 मध्ये झिम्बाब्वे वि. टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये केदार जाधवने 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत. तसेच त्याने फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

- Advertisment -