घरक्रीडातरुण वयातच कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे ऋषभ पंत, 'इतकी' आहे नेट वर्थ

तरुण वयातच कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे ऋषभ पंत, ‘इतकी’ आहे नेट वर्थ

Subscribe

ऋषभ पंतचे हरिद्वार, उत्तराखंड येथे एक आलिशान डिझायनर घर आहे. ऋषभ पंतच्या बेडरूममध्ये भौमितिक, मोनोक्रोम लेआउट आहे. खोल्यांची रचना अतिशय आधुनिक असून भिंतीवर पेंटिंग्ज आहेत

टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या खेळाने जगभर आपले नाव केले आहे. पंत त्याच्या खेळासोबतच विलासी जीवनासाठी ओळखला जातो.

ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा कर्णधारही आहे. वयाच्या २४ व्या वर्षी पंत करोडो रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. ऋषभ पंतची एकूण संपत्ती 66.42 कोटी रुपये आहे. 2021 मध्ये पंतची एकूण संपत्ती 5 दशलक्ष डाॅलर होती. भारतीय रुपयानुसार ही संपत्ती 39 कोटींची आहे.ऋषभ पंतचे कार कलेक्शन खूपच नेत्रदीपक आहे.  त्याच्याकडे करोडो रुपयांच्या कार आहेत. पंतच्या कार कलेक्शनमध्ये Merecedez, Audi A8 आणि Ford यांचा समावेश आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 2 कोटी, 1.80 कोटी आणि 95 लाख रुपये आहे.

- Advertisement -

ऋषभ पंतचे हरिद्वार, उत्तराखंड येथे एक आलिशान डिझायनर घर आहे. ऋषभ पंतच्या बेडरूममध्ये भौमितिक, मोनोक्रोम लेआउट आहे. खोल्यांची रचना अतिशय आधुनिक असून भिंतीवर पेंटिंग्ज आहेत. पंतच्या कुटुंबात बहीण साक्षी आणि आई सरोज यांचा समावेश आहे.

ऋषभ पंतने भारतासाठी आतापर्यंत 30 कसोटी, 24 एकदिवसीय आणि 44 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 40.85 च्या सरासरीने 1920 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने 32.5 च्या सरासरीने 715 धावा केल्या आहेत. याशिवाय पंतने T20 मध्ये 24.55 च्या सरासरीने 712 धावा केल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -