घरक्रीडाVijay Yadav : भारतीय माजी खेळाडूच्या मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले, बीसीसीआय मदत करण्याची...

Vijay Yadav : भारतीय माजी खेळाडूच्या मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले, बीसीसीआय मदत करण्याची शक्यता

Subscribe

भारताचे माजी क्रिकेटपटू विजय यादव यांच्या मदतीसाठी क्रिकेटपटू पुढे सरसावले आहेत. विजय यादव यांची किडनी निकामी झाली आहे. त्यामुळे या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. तसेच त्यांना दोन वेळा हृदयविकाराचे झटके देखील आले आहेत. विजय लोकपल्ली यांनी त्यांच्या ट्विटरवरून यादव यांच्याकडे लक्ष वेधलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून यादव डायलिसिसवर आहेत. तसेच त्यांना दोन झटके देखील आले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. परंतु या ट्विटनंतर यादव यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

- Advertisement -

१९९३मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे षटक टाकावं, असं सुचवणारे यादव हेच होते, असं सांगून लोकापल्ली यांनी ट्विट केलं आहे की, भारताच्या माजी यष्टीरक्षकाला मूत्रपिंड निकामी झाल्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या ते डायलिसिसवर आहेत आणि त्यांना दोन झटके आले आहेत. या ट्विटनंतर यादव यांना मदतीचा ओघ सुरू झाला.

- Advertisement -

क्रिकेटपटूंकडून मदतीचे हात सरसावले

यादव यांच्या मदतीसाठी अनेक माजी क्रिकेटपटू पुढे सरसावले आहेत. हरियाणा क्रिकेट असोसिएशनने त्याला आर्थिक मदत केली आहे. बीसीसीआय देखील मोठे पाऊल टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २००६ मध्ये फरिदाबाद येथे झालेल्या एका कार अपघातात यादव प्रचंड जखमी झाले होते. तेव्हापासून ते त्यांच्या आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. या अपघातात त्यांनी आपल्या ११ वर्षांच्या मुलीला सुद्दा गमावलं आहे.

यादवांची कारकिर्द काय?

यादवांनी एक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते एक सुलभ फलंदाज आणि एक यष्टीरक्षक आहेत. १९९३ मध्ये दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी एकमेव कसोटी खेळली होती.
त्यांनी भारतीय डावात २५ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. तर विनोद कांबळीने ३०१ चेंडूत २२७ धावा केल्या होत्या.

यादवने एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्यांनी ११८ धावा केल्या आणि १९ गडींना बाद केलं. यादव यांनी डिसेंबर १९९२ मध्ये ब्लूमफॉन्टेन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि नोव्हेंबर १९९४ मध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळला आहे.


हेही वाचा : AIFF अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल यांना हटवा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -