Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा क्रिकेटर्स अभिनय करणार तर कलाकारही...; जाहिरातीचा 3 इडियट्स स्टाईल व्हिडीओ व्हायरल

क्रिकेटर्स अभिनय करणार तर कलाकारही…; जाहिरातीचा 3 इडियट्स स्टाईल व्हिडीओ व्हायरल

Subscribe

मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या लीगपैकी एक असलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा थरार सहा दिवसांपासून म्हणजेच 31 मार्चपासून सुरू होणार आहे. परंतु आयपीएल आधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी पत्रकार परिषदेत एकाच रंगाची जर्सी घालून बसल्यामुळे पत्रकारांमध्ये 3 इडियट्सचा सिक्वेल येत असल्याची चर्चा सुरू होते. मात्र हा व्हिडीओ एका जाहिरातीचा आहे हे शेवटला समजते.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांचा हा व्हिडिओ ड्रीम 11 या बेटींग अॅपची जाहिरात करत आहेत. हे तिघे या जाहिरातीत क्रिकेटर्स बोलताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, आजकाल क्रिकेटर्स मोठ्या प्रमाणात अभिनय करताना दिसत आहेत. त्यामुळे आता कलाकारही क्रिकेट खेळायला सुरूवात करणार आहेत. आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्याशिवाय या व्हिडीओमध्ये भारतीय संघातील काही खेळाडू आहे. जसे की, भारताचा कर्णधार रोहित शर्मासह जयप्रीत बुमहार, आर आश्विन, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या हे खेळाडू आहेत.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये अनेक मजेशीर क्षण असून कलाकार आणि क्रिकेटर्स एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत. जेव्हा हे कलाकार एकमेकांची स्तुती करतात तेव्हा क्रिकेटर्सची त्यांची खिल्ली उडवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर खानपासून बोमन इराणी आणि जावेद जाफरी यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -