Cristiano Ronaldoचा जुव्हेंटस क्लबला बायबाय…

रोनाल्डोचे मँचेस्टर क्लबमध्ये स्वागत, दोन वर्षांचा करार

Cristiano Ronaldo agrees to Manchester United return
Cristiano Ronaldoचा जुव्हेंटस क्लबला बायबाय...

पोर्तुगालचा जग प्रसिध्द फुटबॉल खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डो याने शुक्रवारी जुव्हेंटस या फुटबॉल क्लबला गुडबाय करत आपल्या जुण्या क्लबकडे पुन्हा परतला आहे. रोनाल्डोन २०१८ सालीला लिगा क्लब रेआल माद्रिदसोबतचा नऊ वर्षांचा प्रवास संपवून जुव्हेंटस क्लबच्या ताफ्यात गेला होता. रेआल माद्रिदसोबत खेळताना चार चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन ला लिगा कप त्याच्या नावे आहेत. तसेच ३० मोठ्या स्पर्धांची जेतेपद त्याच्या नावावर आहेत.

१२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रोनाल्डोने गाठले मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब 

३६ वर्षीय रोनाल्डो २००३ ते २००९ अशी सहा वर्ष मँचेस्टर युनायटेड या क्लबकडून खेळताना २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत. पुन्हा एकदा तो मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबमध्ये दाखल झाला आहे. रोनाल्डो याने पुढील दोन वर्षांसाठी या क्लब बरोबर करार केला आहे. क्रिस्तिआनो रोनाल्डोला मालामाल करणारा हा करार आहे. आता मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब रोनाल्डोला प्रत्येक आठवठ्याला चार कोटी ८५ लाख मोजणार आहे. त्याच बरोबर इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त मानधन कमावणारा खेळाडू झाला आहे. तब्बल १२ वर्ष वाट पाहिल्या नंतर क्रिस्तिआनो रोनाल्डोचं मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब गाठला आहे.

“मँचेस्टर युनायटेड हा एक क्लब आहे, ज्याचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान आहे. शुक्रवारच्या घोषणेनंतर मला मिळालेल्या सर्व संदेशांमुळे मी भारावून गेलो आहे. मी ओल्ड ट्रॅफर्डमध्ये पूर्ण स्टेडियमसमोर खेळण्यासाठी थांबू शकत नाही आणि पुन्हा सर्व चाहत्यांना पाहण्यास उत्सुक आहे”, असे रोनाल्डोने म्हटले आहे.

मँचेस्टर फुटबॉल क्लबचे प्रेक्षकही क्रिस्तिआनो रोनाल्डोचा खेळ पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. रोनाल्डो या दोन वर्षांच्या करारामध्ये मँचेस्टर क्लबकडून आपला खेळ आणि कोणती कमाल करबन दाखवतो याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.


हेही वाचा – Dale Steyn Retirement : साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला संन्यास