रोनाल्डोने जगातील सर्वात महागडी कार केली खरेदी, किंमत ऐकून व्हाल थक्क

cristiano ronaldo buys worlds most expensive car
रोनाल्डोने जगातील सर्वात महागडी कार केली खरेदी, किंमत ऐकून व्हाल थक्क

पोर्तुगालचा लोकप्रिय फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डोने जगातील सर्वात महागाडी बुगाटी (Bugatti La Voiture Noire) कार खरेदी केली आहे. रोनाल्डो ज्या क्लबसाठी फुटबॉल खेळतो त्या क्लबने नुकतीच ३६ वी मालिका ए चॅम्पियनशिप जिंकली आहे. यानंतर त्याने ही कार गिफ्ट म्हणून खरेदी केली आहे. या कारची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. रोनाल्डोने ही कार खरेदी करण्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

रोनाल्डोने खरेदी केलेली कार तयार करणाऱ्या कंपनीने अशा १० कार तयार केल्या आहेत. त्याने बुगाटी (सेंटोडीसी) खरेदी करण्यासाठी सुमारे ८.५ मिलियन युरो (जवळपास ७५ कोटी रुपये) दिले आहेत. ३५ वर्षीय स्टार फुटबॉलर रोनाल्डोने या कारचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसाठी शेअर केला असून त्याची माहिती दिली आहे. जगातील सर्वात महागड्या गाडी मालक रोनाल्डोच्या गॅरेजमधील सर्व कारच्या एकूण किंमत ३० मिलियन युरो म्हणजे २६४ कोटी रुपये पेक्षा जास्त असेल.

बुगाटी कार ३८० किमी प्रतितास धावू शकते. तसेच २.४ सेंकदात या कारचा वेग ६० किमी प्रतितास धावू शकते. तथापि या कारसाटी रोनाल्डोला २०२१ पर्यंत थांबावे लागेल आणि पुढच्या वर्षी या कारची डिलिव्हरी मिळेल. काही दिवसांपूर्वीच बुगाटी आणि नाइके कंपनीने एकत्र येऊन क्रिस्तिआनो रोनाल्डोसाठी एक बूट तयार केला. स्पोर्टसवेअर ब्रँडने ऑटोमोबाईल ब्रँडसह एकत्रित ‘नाइके मर्क्यूरियल सुपरफ़्लरी CR7 Dieci’लाँच केला आहे.


हेही वाचा – आयपीएलच्या तेराव्या हंगामाला केंद्राची मान्यता; युएई प्रवासाचा मार्ग मोकळा