घरक्रीडाUCL : रोनाल्डोच्या ज्युव्हेंटसची मेस्सीच्या बार्सिलोनावर मात

UCL : रोनाल्डोच्या ज्युव्हेंटसची मेस्सीच्या बार्सिलोनावर मात

Subscribe

बार्सिलोना संघाला या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही.

क्रिस्तिआनो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या जोरावर ज्युव्हेंटसने युएफा चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात बार्सिलोनावर ३-० अशी मात केली. रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या संघांमधील सामन्याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. मात्र, मेस्सीच्या बार्सिलोना संघाला या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही आणि याचा रोनाल्डोच्या ज्युव्हेंटस संघाने फायदा घेत हा सामना जिंकला. या सामन्यात १३ व्या आणि ५२ व्या मिनिटाला ज्युव्हेंटसला पेनल्टी मिळाली. रोनाल्डोने या दोन्ही पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले. ज्युव्हेंटसचा तिसरा गोल वेस्टन मॅकिनीने केला. हा ज्युव्हेंटसचा सहा सामन्यांत पाचवा विजय ठरला. त्यामुळे त्यांनी १५ गुणांसह गट ‘जी’मध्ये अव्वल स्थान पटकावले.

- Advertisement -

मँचेस्टर युनायटेड स्पर्धेतून बाहेर  

दुसरीकडे आरबी लॅपझिगविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे मँचेस्टर युनायटेडचे चॅम्पियन्स लीगमधील आव्हान संपुष्टात आले. युनायटेडला स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी हा सामना किमान बरोबरीत संपवणे गरजेचे होते. मात्र, लॅपझिगने हा सामना ३-२ असा जिंकल्यामुळे युनायटेडचा संघ स्पर्धेतून आऊट झाला. या सामन्यात अँजेलिनो, अमादू हैदारा आणि जस्टिन क्लूईवर्ट यांनी केलेल्या गोलमुळे लॅपझिगला ३-० अशी आघाडी मिळाली होती. ब्रुनो फर्नांडेस आणि कोणाते (स्वयं गोल) यांच्या गोलमुळे युनायटेडने लॅपझिगची आघाडी ३-२ अशी कमी केली होती. मात्र, यानंतर त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे लॅपझिग आणि पॅरिस सेंट जर्मान या संघांनी गट ‘एच’मधून स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -