घरक्रीडायजमान रशियाचे पॅकअप

यजमान रशियाचे पॅकअप

Subscribe

फिफा विश्वचषकाचे चित्र आता हळू हळू स्पष्ट होत चालले आहे. फ्रान्स, बेल्जियम, इग्लंड आणि क्रोएशिया यांच्यापैकी एक संघ फिफा विश्वचषक २०१८ वर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. काल उपांत्यपूर्व फेरीच्या चौथ्या सामन्यात क्रोएशियाने रशियाला पेनल्टी शूटआउटमध्ये ४-३ धूळ चारत उंपात्य फेरीत अतिशय दिमाखात प्रवेश केला. १० जुलै रोजी फ्रान्स vs बेल्जियम आणि ११ जुलै रोजी इग्लंड vs क्रोएशियाचा सामना होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत अनेक नवे रेकॉर्ड स्थापन झाले. क्रोएशिया २० वर्षांनंतर तर इग्लंड २८ वर्षांनंतर फिफाच्या विश्वचषकाच्या उंपात्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

काल रशिया vs क्रोएशियाचा सामन्यात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये यजमान रशियाच्यावतीने ३१ मिनिटाला डेनिस चेरिशेवने शानदार मैदानी गोल करत रशियाचे खाते उघडले. त्यानंतर लगेचच ३९ व्या मिनिटाला आंद्रेजने क्रोएशियासाठी गोल करत रशियाची बरोबरी साधली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघ गोलची आघाडी करण्यासाठी झगडताना दिसत होते. मात्र अतिशय अटितटिच्या चाललेल्या या सामन्यात दुसऱ्या हाफ टाइममध्ये दोन्ही संघाना गोल करता आले नाही.

- Advertisement -
Croatia beat host Russia
सामना जिंकल्यानंतर जल्लोश करताना क्रोएशियाचा संघ

एक्स्ट्रा टाइमच्या १०० व्या मिनिटाला क्रोएशियाच्या डोमागोजने दुसरा गोल डागला आणि क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात सामन्याच्या ११५ मिनिटाला रशियाच्या मारीयो फर्नांडिसने फ्री किकवर गोल डागत रशियाचे स्वप्न जागे ठेवले. त्यानंतर दोन्ही संघाची दोन-दोन अशी बरोबरी झाल्यामुळे सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटने घेण्याचे ठरले. पेनल्टी शूटआउटच्या पहिल्या ४ शॉट्समध्ये दोन्ही संघ ३-३ च्या बरोबरीत होते. मात्र ५ व्या आणि अंतिम किकवर क्रोएशियाच्या मार्सेलोने बाजी मारत चौथा निर्णायक गोल करत क्रोएशियाचे २० वर्षांनी उपांत्यफेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण केले.

सामन्यात क्रोएशियाचीच पूर्ण पकड

सामन्यातील आकडेवारी पाहिली तर क्रोएशियाचा संघ रशियावर सुरुवातीपासूनच भारी पडल्याचा दिसून येतो. क्रोएशियाकडून ७३० पासेस देण्यात आले तर रशियाचे ४०० पासेस आहेत. पासेसची अक्युरसीमध्येही क्रोएशियाच रशियाच्या पुढे आहे. गोलपोस्टवर क्रोएशियाने १८ शॉट्स मारले होते तर रशियाचे १३ शॉट्स होते. येल्लो कार्डच्याबाबतीत मात्र रशियाने समाधानकारक कामगिरी केले. रशियाच्या एकाच खेळाडूला तर क्रोएशियाच्या चार खेळांडूना येल्लो कार्ड मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -