Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 DC vs CSK : चेन्नईचा दिल्लीवर 77 धावांनी विजय, प्ले...

IPL 2023 DC vs CSK : चेन्नईचा दिल्लीवर 77 धावांनी विजय, प्ले ऑफचे तिकीट केले पक्के

Subscribe

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लीग स्टेजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. यावेळी चेन्नई संघानं 77 धावांनी दिल्लीवर विजय मिळवला आहे. चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी 224 धावांचे आव्हान दिले होते. परंतु हे आव्हान पूर्ण करण्यात दिल्लीला अपयश आलं. चेन्नईने अवघ्या 146 धावांमध्येच दिल्लीला गुंडाळून टाकलं आणि प्ले ऑफमध्ये आपलं तिकीट पक्कं केलं.

चेन्नईने 17 गुण पटकावत प्ले ऑफचे स्थान पक्के केले आहे. सध्या चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईला आठ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा चेन्नई हा दुसरा संघ आहे. याआधी गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. परंतु लखनऊ आणि कोलकाता यांच्यात आता सामना सुरू असून लखनऊने जर कोलकात्याचा विराट पराभव केला, तर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर घसरु शकतो. अशातच लखनऊ आणि कोलकाता यांच्यात क्वालिफायरचा एक सामना होईल आणि लखनऊने कोलकाता संघाचा पराभव केला तर चेन्नई आणि लखनऊ यांच्यात समान गुण होतील.

- Advertisement -

चेन्नईने 223 धावांचं आव्हान दिल्यानंतर त्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला फिल्प सॉल्ट 3 धावांची भर घालून परतला. दिल्लीची अवस्था 3 बाद 26 धावा अशी झाली असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने डाव सावरला. त्याने आक्रमक फलंदाजी करत दिल्लीला 11व्या ओव्हर्समध्ये 75 धावांपर्यंत पोहचवले. मात्र, त्याला साथ देणारा यश धूल 13 धावा करून बाद झाला.

- Advertisement -

डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत 86 धावांची झुंजार खेळी करत दिल्लीला 140 धावांच्या वर पोहोचवले. मात्र, 20 ओव्हर्समध्ये दिल्लीने 9 गडी गमावत 146 धावा केल्या आणि दिल्लीचा पराभव झाला. त्यामुळे चेन्नईला प्ले ऑफमध्ये जाण्याचा मार्ग खुला झाला. परंतु लखनऊ आणि कोलकाता यांच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : शाहरुख खानमुळे प्रीती झिंटाचा आनंद द्विगुणीत; Video व्हायरल


 

- Advertisment -