घरक्रीडादिल्लीला धूळ चारत चेन्नई झोकात फायनलमध्ये!

दिल्लीला धूळ चारत चेन्नई झोकात फायनलमध्ये!

Subscribe

दिल्लीने चेन्नईला १४८ धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे आव्हान सहज पूर्ण करत अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केले आहे.

चेन्नईने दणकेबाज फलंदाजी करत दिल्ली घरचा रस्ता धावत अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. आयपीएलच्या १२ व्या हंगामातील सेकंड क्वालिफायर सामना शुक्रवारी विशाखापट्टणम येथे खेळला गेला. चेन्नईने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कररण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना धूळ चारत १४७ धावांवर थांबवलं. त्यानंतर १४८ धावांच्या माफक आव्हानाला चेन्नईने सहज पूर्ण केलं. या मोसमात दिल्लीने फार मेहनत केली होती. दिल्लीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे दिल्ली अंतिम सामन्यात मजल मारु शकेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, चेन्नईने केलेल्या पराभवानंतर दिल्लीच्या अंतिम संघासोबतच जेतेपदाचे स्वप्न देखील भंग झाले आहे. दिल्लीने अजूनपर्यंत एकदाही जेतेपद पटकावलेले नाही.

दिल्लीने दिलेल्या आव्हानाला सामोरे जाताना चेन्नईची सुरुवात आक्रमक ठरली. सलामीवीर शेन वॉटसन आणि फॅफ डू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागिदारी केली. त्यामुळे चेन्नईला विजयाचा पल्ला सहज सोप्पा झाला. फॅफ डू प्लेसिसने ३९ चेंडूत ५० धावा केल्या. यामध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला. त्यानंतर शेन वॉटसन देखील अर्धशतक करुन माघारी परतला. त्याने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. मात्र, सुरेशा रैना स्वस्तात परतला. त्याने १३ चेंडूत ११ धावा केल्या. यानंतर महेंद्र सिंह धोनीने अंबाती रायडू सोबत डाव सावरत चेन्नईला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

प्रथम फलंदाजी आलेल्या दिल्लीची सुरुवातच फार खराब ठरली. दिल्लीच्या पूर्ण संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक देखील करता आले नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ पक्त ५ धावांवर तंबूत परतला. शिखर धवनही स्वस्तात माघारी परतला. त्याने १४ चेंडूत १८ धावा केल्या. यामध्ये धवनने ३ चौकार लगावले. परंतु, उंच फटका मारण्याच्या गडबडीत तो बाद झाला. कॉलिन मन्रो देखील २७ धावा करुन बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने १८ चेंडूत १३ धावा केल्या. तो देखील झेलबाद झाला. नेहमीप्रमाणे ऋषभपंतने झुंज सुरु ठेवली. या दरम्यान त्याचे इतर जोडीदार अक्सार पटेल शेफरन रुदरफोर्ड किमो पॉल काही धावांच्या अंतरावर बाद झाले. अखेर उंच षटकार मारण्याच्या नादात ऋषभपंत झेलबाद झाला. दिल्लीने २० षटकांत ९ बाद १४७ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -