महेंद्र सिंग धोनीची नवी इनिंग; चित्रपट बनवणार, अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत

भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महेंद्र सिंग धोनी याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत भारतीय संघाला अनेक सामने अखेरच्या क्षणी जिंकवून दिले आहेत. त्यानंतर आता महेंद्र सिंग धोनी नव्या क्षेत्रात म्हणजेच सिने क्षेत्रात प्रवेश करणार आहे.

भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महेंद्र सिंग धोनी याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत भारतीय संघाला अनेक सामने अखेरच्या क्षणी जिंकवून दिले आहेत. त्यानंतर आता महेंद्र सिंग धोनी नव्या क्षेत्रात म्हणजेच सिने क्षेत्रात प्रवेश करणार आहे. महेंद्रसिंह धोनी लवकरच एका तामिळ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. धोनीने एका तामिळ प्रोजेक्टची निवड केल्याची माहिती आहे.

स्पोर्ट्स टायगरने दिलेल्या वृत्तानुसार, महेंद्रसिंह धोनीने एका तामिळ प्रोजेक्टची निवड केल्याची माहिती आहे. क्रिकेट आणि चेन्नई सुपर किंग्समुळे एमएस धोनीची तामिळनाडूत मोठी लोकप्रियता आहे. याच लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. धोनीने दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा बरोबर हातमिळवणी केली आहे. धोनीच्या चित्रपटात नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसू शकते. मे महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे.
तामिळ चित्रपटांमध्ये नशीब आजमवणार धोनी पहिला क्रिकेटपटू नाही. धोनीच्या आधी हरजभज सिंगने सुद्धा ‘डिक्कीलूना’ मध्ये काम केलं होतं. क्रिकेट करीयर संपल्यानंतर भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी दुसरी इनिंग म्हणून चित्रपटात काम करुन पाहिलय. पण कोणीच स्वत:ला स्थापित करु शकल नाही. धोनी त्याच्या तामिळ चित्रपटात काम करणार की, नाही हे माहित नाही. पण तो चित्रपटाची निर्मिती करतोय.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. पण फ्रेंचायजी क्रिकेट तो अजून खेळतोय. यंदाचा इंडियन प्रीमियर लीगचा त्याचा शेवटचा सीजन असू शकतो. हा सीजन सुरु होण्याआधी धोनीच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पण धोनीने आपल्या बॅटनेच टीकाकारांची तोंड बंद केली. धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन बनला आहे.

फिनिशरचा रोल उत्तमरित्या वठवतो. प्रतिस्पर्धी संघांसाठी आजही महेंद्रसिंह धोनी एक आव्हान आहे. खेळाची त्याला उत्तम समज आहे. हाच धोनी क्रिकेटच्या पीचवर ठसा उमटवल्यानंतर सिने क्षेत्रात प्रवेश करतोय. याआधी सुद्धा अनेक क्रिकेटपटूंनी दुसरी इनिंग म्हणून सिनेमात आपलं नशीब आजमावून पाहिलय. पण धोनीचा रोल थोडा वेगळा आहे.


हेही वाचा – राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा