घरIPL 2020IPL 2020 : CSK चे कोच स्टीफन फ्लेमिंग म्हणतात, 'आम्ही शेवटच्या स्थानी,...

IPL 2020 : CSK चे कोच स्टीफन फ्लेमिंग म्हणतात, ‘आम्ही शेवटच्या स्थानी, तीच आमची जागा’!

Subscribe

यंदाच्या IPL मध्ये CSK अर्थात Chennai Super Kings ला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी न केल्यामुळे CSK चे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. चाहत्यांसोबतच चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने देखील त्याची नाराजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरोधात झालेल्या पराभवानंतर बोलून दाखवली होती. आता चेन्नईच्या संघाचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी आपला राग व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध तब्बल १० विकेट्सने चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीका होत आहे. त्यातच आता स्टीफन फ्लेमिंगने देखील आपल्या संघाच्या कामगिरीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये सगळ्यात खाली आहोत. आणि आम्ही त्याच जागेसाठी पात्र आहोत’, असं स्टीफन फ्लेमिंग म्हणाले आहेत. मुंबई इंडियन्सविरूद्ध पराभूत झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

चेन्नईने आत्तापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये ११ सामने खेळले असून त्यातल्या ८ सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजपर्यंत झालेल्या आयपीएलच्या इतिहासात ही चेन्नईची सर्वात वाईट कामगिरी आहे. शिवाय, आयपीएल सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान मिळणार नसल्यामुळे टीममध्ये देखील निराशेचं वातावरण असल्याचं स्टीफन फ्लेमिंग यांनी मान्य केलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले स्टीफन फ्लेमिंग?

मॅचनंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, ‘मुंबई इंडियन्सविरूद्ध झालेला पराभव हा आमच्या पूर्ण सीजनमधल्या कामगिरीचा आरसाच आहे. चेन्नई पॉइंट टेबलमध्ये सगळ्यात खाली आहे. आणि आम्ही त्याच जागेसाठी पात्र आहोत. हा आमच्यासाठी एक खूपच निराशादायी आणि आश्चर्यचकित करणारा सीजन राहिला आहे. खूप साऱ्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण आम्ही एक होऊन खेळू शकलो नाही.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -