Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा मी बाद होण्यासाठी CSK चाहते प्रार्थना करतात; रवींद्र जडेजा असे का म्हणाला?

मी बाद होण्यासाठी CSK चाहते प्रार्थना करतात; रवींद्र जडेजा असे का म्हणाला?

Subscribe

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएल 2023 मध्ये खेळलेल्या 55 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capital) 27 धावांनी पराभव केला आणि प्लेऑफच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. या सामन्यात सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आपली व्यथा मांडताना सांगितले की, मी बाद होण्यासाठी सीएसके चाहते प्रार्थना करतात. (Delhi Capitals challenge in the tournament ends)

जडेजा म्हणाला की, जडेजाने सामन्यानंतर याचा खुलासा करताना सांगितले की, एक संघ म्हणून आम्ही उत्कृष्ट कामगिरी करत आहोत. मात्र फलंदाजीवेळी ज्यावेळी मी वरच्या क्रमांकावर येतो, त्यावेळी चाहते माही माही नावाचा जयघोष करत असतात. मी आणखी वरच्या क्रमांकावर फलंदाजी आलो तर, चाहते माझ्या बाद होण्यासाठी प्रार्थना करतात. मात्र, संघ म्हणून आम्ही एक आहोत याचा आनंद आहे.”

- Advertisement -

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे तर, सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 8 विकेट गमावताना 168 धावा केल्या होत्या. यावेळी शिवम दुबे याने 12 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याशिवाय ऋतुराज गायकवाड (24), अंबाती रायुडू (23), अजिंक्य रहाणे (21), रवींद्र जडेजा (21) आणि एमएस धोनी (20) यांनी धावांचे योगदान दिले. यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना मिचेल मार्श याने 3 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अक्षर पटेलने 2 आणि खलील अहमद, ललित यादव, कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

सीएसकेकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून रायली रुसो याने 37 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 35 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त मनीष पांडे (27), अक्षर पटेलने (21), फिलिप सॉल्ट (17) धावा करून बाद झाले, तर कर्णधार डेविड वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्यामुळे दिल्लीला 27 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी चेन्नईकडून मथीशा पथिराना  याने 4 षटके गोलंदाजी करताना 37 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय दीपक चहरला 2 आणि रवींद्र जडेजाला 1 विकेट मिळाली. या पराभवामुळे दिल्ली कॅपिटलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफ्सच्या जवळ पोहोचली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -