घरक्रीडाIPL 2022 Mega Auction : आयपीएल लिलावात सुरेश रैना UNSOLD, चेन्नईच्या संघाचा...

IPL 2022 Mega Auction : आयपीएल लिलावात सुरेश रैना UNSOLD, चेन्नईच्या संघाचा आला मॅसेज

Subscribe

आयपीएलच्या यशस्वी फलंदाजांपैकी मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनावर बोली लावण्यात आलेली नाहीये. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाने सुद्धा रैनाला रामराम ठोकला आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे झालेल्या दोन दिवसीय लिलावात सर्व १० संघांनी ६०० खेळाडूंवर बोली लावली होती. मात्र, रैनावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तसेच चेन्नईच्या संघाकडून एक संदेशही जारी करण्यात आला आहे.

रैनाने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील मेगा लिलावात २ कोटींसाठी सहभागी झाला होता. परंतु पहिल्याच दिवशी त्याला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. तसेच दुसऱ्याही दिवशी कोणत्याही फ्रँचायझी संघाने त्याला खरेदी करण्यास रस दाखवलेला नाहीये.

- Advertisement -

२०२० मध्ये कोरोना विषाणूमुळे रैनाने खेळण्यातून माघार घेतली होती. मेगा लिलावात रैनाची निवड न झाल्यामुळे सीएसकेने त्याला संदेश जारी करून दिग्गज खेळाडूला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आम्हा सर्वांना दिलेल्या यलो आठवणीबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. तसेच त्यांनी चिन्ना थला असं देखील पुढे म्हटलंय.

- Advertisement -

यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात सलामीवीर फलंदाज सुरेश रैना आणि स्टीव्ह स्मिथसह अजून दोन खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. सुरेश रैनाला आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज या टीमने रिटने केले नाही. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथही विकला गेला नाही.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरवर देखील बोली लावण्यात आलेली नाहीये. दुसरीकडे शाकीब अल हसन सारख्या बांगलादेशच्या अनुभवी ऑलराऊंडरलाही बोली प्रक्रियेत स्थान मिळालेलं नाहीये. मात्र, जे खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत.


हेही वाचा : Maratha Reservation : २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरूवात करणार – संभाजीराजे छत्रपती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -