घरIPL 2020IPL 2020 : सॅम करनची एकाकी झुंज; मुंबईला ११५ धावांचे आव्हान 

IPL 2020 : सॅम करनची एकाकी झुंज; मुंबईला ११५ धावांचे आव्हान 

Subscribe

चेन्नईची ही यंदाच्या मोसमातील सर्वात कमी धावसंख्या ठरली.

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये सामना होत आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ११४ धावाच करता आल्या. चेन्नईची ही यंदाच्या मोसमातील सर्वात कमी धावसंख्या ठरली. चेन्नईच्या संघाने यंदाच्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांना याआधी १० पैकी केवळ ३ सामने जिंकता आले होते. त्यामुळे हा संघ गुणतक्त्यात तळाला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही चेन्नईच्या फलंदाजांना चांगला खेळ करण्यात अपयश आले. मुंबईकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने १८ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या. त्याला जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांनी २-२ विकेट घेत चांगली साथ दिली.

तीन धावतच गमावल्या चार विकेट 

शारजा येथे होत असलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नईच्या डावाची खराब सुरुवात झाली. बोल्टने ऋतुराज गायकवाड (०) आणि फॅफ डू प्लेसिस (१) यांना, तर जसप्रीत बुमराहने अंबाती रायडू (२) आणि जगदीशन (०) यांना झटपट माघारी पाठवले. चेन्नईने तीन धावतच चार विकेट गमावल्या. कर्णधार धोनीने काही चांगले फटके मारत १६ चेंडूत १६ धावा केल्या. मात्र, त्याला राहुल चहरने बाद केले. यानंतर सॅम करनने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी केल्याने चेन्नईने शंभर धावांचा टप्पा पार केला. चेन्नईने २० षटकांत ९ बाद ११४ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -