CSK vs KKR : केकेआरला चेन्नईविरुद्ध पराभवाचा बदला घेण्याची संधी

नवी दिल्ली : IPL 2023 मध्ये आज संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (chepauk stadium) होणाऱ्या या सामन्यात केकेआरला मागली सामन्यातील पराभवाचा वचवा काढण्याची संधी आहे.

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 33 व्या सामन्यात सीएसकेने कोलकाताच्या ईडन गार्डनवर केकेआरचा 49 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे चेन्नईला घरच्या मैदानावर पराभव करण्याची केकेआरला संधी आहे. चेन्नईचे चेपॉक स्टेडियम सीएसकेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे केकेआरसाठी मोठे आव्हान असणार आहे.

सीएसके या हंगामात चांगली कामगिरी करत आहे. सीएसकेने घरच्या मैदानावरील मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांनी मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने पराभव केला आहे, तर त्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा २७ धावांनी पराभव केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत आहे. कॉनवे आणि गायकवाड हे दोन्ही सलामीवीर सीएसकेसाठी चांगली कामगिरी करत आहेत. शिवम दुबे मधल्या फळीत मोठे फटके मारून संघाची धावगती वाढवत आहे.  त्याला अजिंक्य रहाणे आणि मोईन अलीची चांगली साथ मिळत आहे. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी सामन्याचा शेवट उत्तमरित्या करत आहेत.

दीपक चहरच्या पुनरागमनामुळे सीएसके गोलंदाजी आक्रमण आणखी प्रभावी झाले आहे. तुषार देशपांडे आणि मशिथा पाथिराना हे प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट काढत आहेत, तर मशिथा पाथिराना डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून उदयास येत आहे. महेश तेक्षाना आणि जडेजा फिरकी गोलंदाजी आक्रमक करत आहेत. सीएसकेने आतपर्यंत 12 सामने खेळताना 7 विजय मिळाला आहे, तर 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नई 15 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत सीएसकेला प्लेऑफच्या दिशेने अजून एक पाऊल टाकण्याची संधी आहे.

केकेआरच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचे तर संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी समाधानकारक राहिली आहे. सलामीवीर फलंदाज जेसन रॉयने पहिल्या दोन सामन्यात सलग अर्धशतके झळकावल्यानंतर तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याचवेळी शतकवीर व्यंकटेशच्या बॅटमधूनही सातत्याने धावा निघत नाही आहेत. इतर फलंदाजही सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. वरुण चक्रवर्तीशिवाय इतर गोलंदाज गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मागील पराभवाचा वचवा काढण्यासाठी आणि सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवण्यासाठी केकेआरला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन
सीएसके :
रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (सी आणि विकेट), मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना, आकाश सिंग, ड्वेन प्रिटोरियस, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, आर.एस. हंगरगेकर, मिचेल सँटनर, अजय जाधव मंडल, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, भगत वर्मा, निशांत सिंधू.

केकेआर : एन जगदीसन (विकेटकीप), जेसन रॉय, नितीश राणा (क), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, मनदीप सिंग, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, ली. दास, टिम साउथी, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, रहमानउल्ला गुरबाज, हर्षित राणा, आर्या देसाई.