घरक्रीडाIPL 2022: आयपीएलमध्ये आजपासून दस का दम, CSK आणि KKR भिडणार आमनेसामने

IPL 2022: आयपीएलमध्ये आजपासून दस का दम, CSK आणि KKR भिडणार आमनेसामने

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दहा संघ मैदानात उतरणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदावरून पाय उतार झाला असून आता चेन्नईच्या संघाची पुढील धुरा चेन्नईचा अष्टपैलू रवींद्र जडेजा सांभाळणार आहेत. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. CSK आणि KKR यांच्यातील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्हीही कर्णधार हा सामना जिंकण्यासाठी आपली बाजी पणाला लावतील.

मागील आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. यावेळच्या आयपीएलमध्ये सीएसके संघाने महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन केलं आहे. तसेच रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाची पहिल्याच सामन्यात कसोटी असणार आहे. दोन्ही संघात झालेल्या सामन्यांची आकडेवारी बघितली असता कोलकाता नाइट रायडर्सपेक्षा चेन्नई सुपर किंग्जचं पारडं जड आहे.

- Advertisement -

या दोन्ही संघामध्ये एकूण २५ सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने १७ सामन्यात विजय मिळवला असून कोलकाता नाइट रायडर्सला केवळ ८ सामन्यातच विजय मिळवता आलेला आहे.

असा असेल चेन्नई सुपर किंग्सचा प्लेइंग इलेव्हन संघ –

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने आणि प्रशांत सोलंकी.

- Advertisement -

असा असेल कोलकाता नाईट रायडर्सचा प्लेइंग इलेव्हन संघ –

व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, सुनील नारायन, टीम साऊदी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.

या सामन्याची सुरूवात कधी ?

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होणार आहे. त्यानंतर सामन्याला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, आयपीएल लीगचे सर्व ७० सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत. एकूण ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २० सामने, सीसीआयचे १५, डीवाय पाटील स्टेडियममध्ये २० सामने होणार आहे. तर पुण्यात एमसीए स्टेडियमवर १५ सामने खेळवले जाणार आहेत.


हेही वाचा : अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -