घरक्रीडाचेन्नईत हैदराबादचा खुर्दा; घरच्या मैदानावर चेन्नईच सुप्पर!

चेन्नईत हैदराबादचा खुर्दा; घरच्या मैदानावर चेन्नईच सुप्पर!

Subscribe

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून रोमांचक ठरलेल्या लढतीमध्ये अवघ्या एका धावेनं पराभव पत्कराव्या लागलेल्या चेन्नईच्या टीमनं मंगळवारी सनरायजर्स हैदराबादसमोर मात्र त्या पराभवातून झालेल्या नुकसानाची भरपाई केली आणि पॉइंट टेबलमध्ये आपलं पहिलं स्थान पुन्हा मिळवलं. आयपीएलच्या ४१व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादला चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर धूळ चारली.

टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन कूल धोनीनं घरच्या मैदानावर आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आक्रमणाची आयती संधी मिळालेल्या सनरायजर्स हैदराबादला या संधीचा फायदा उचलला आला नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये हरभजन सिंगनं जॉनी बेअरस्टॉला माघारी धाडत चेन्नईची बोहनी केली. पण त्यानंतर आलेल्या मनीष पांडेनं विकेटसाठी चेन्नईच्या बॉलर्सला चांगलीच दमछाक करायला लावली. तुफान बॅटिंग करत पांडेनं भक्कम वाटणाऱ्या चेन्नईच्या बॉलिंगची पिसं काढली. सलामीवीर डेविड वॉर्नरसोबत (४५ बॉल ५७ रन) पांडेनं दुसऱ्या विकेटसाठी ११५ रनांची भागीदारी केली. १४व्या ओव्हरमध्ये हरभजननंच वॉर्नरला माघारी धाडत दुसरं यश मिळवून दिलं. त्यानंतर आलेल्या विजय शंकरनंही आक्रमक बॅटिंग करत २० बॉलमध्ये २६ धावा फटकावल्या. मात्र हैदराबादच्या डावाचा खरा किंग ठरला तो मनीष पांडे. अवघ्या ४९ बॉलमध्ये ८३ रन वसूल करणाऱ्या पांडेनं ७ चौकार आणि ३ षटकार लगावले.

- Advertisement -

विजयासाठी १७६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब आणि संथ झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त ३ रन स्कोअरबोर्डवर असताना फॅफ डुप्लेसीस १ रन करून रनआऊट झाला. त्यानंतर मात्र सुरेश रैनानं सलामीवीर वॉटसनसोबत डावाला आकार द्यायला सुरुवात केली. सुरेश रैनाचा जम बसलाय असं वाटत असतानाच राशीद खाननं त्याला आऊट केलं. २४ बॉलमध्ये ३८ रन करणारा रैना आऊट झाला तेव्हा चेन्नईचा स्कोअर होता १० ओव्हरमध्ये ८० रनांवर २ विकेट!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -