घरक्रीडाIPL Mega Auction 2022: CSK चार खेळाडू करणार रिटेन, लवकरच IPL संघांची...

IPL Mega Auction 2022: CSK चार खेळाडू करणार रिटेन, लवकरच IPL संघांची घोषणा

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या आगामी हंगामाआधीच आयपीएलमधील फ्रॅंचायसीमध्ये मेगा ऑक्शनची प्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामातील जुन्या ८ संघांना आपले खेळाडू रिटेन करण्याची संधी या ऑक्शनच्या माध्यमातून मिळणार आहे. आयपीएलच्या फ्रॅंचायसीसाठीच्या नियमावलीनुसार प्रत्येक संघाला चार खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळणार आहे. या खेळाडूंच्या रिटेनच्या निमित्ताने बीसीसीआय आणि आयपीएल संघांच्या व्यवस्थापनांमध्ये चर्चा झाली असल्याचे कळते. त्यानुसार प्रत्येक संघाला चार खेळाडू रिटेन करता येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जमधून कोणत्या चार खेळाडूंना संधी मिळणार हेदेखील जवळपास निश्चित झाले आहे.

प्रत्येक संघाकडून रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंमध्ये चार खेळाडूंमध्ये एक ते दोन अशा परदेशी खेळाडूंचाही समावेश असू शकतो. त्यामुळे आता प्रत्येक संघासाठी आव्हान असणार आहे की कोणत्या भारतीय खेळाडूंना तसेच कोणत्या परदेशी खेळाडूंना आयपीएलच्या रिटेन्शनच्या प्रक्रियेत समाविष्ट करायचे. यंदाच्या ऑक्शनच्या प्रक्रियेआधी एकुण आठ संघांना खेळाडू रिटेन करण्याचा पर्याय मिळणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या आयपीएलच्या ऑक्शन प्रक्रियेत प्रत्येक टीमकडे असणाऱ्या पर्सचे लिमिट हे ९० कोटी १०० कोटीपर्यंत पोहचू शकते. जर एखादा संघ चार खेळाडूंना रिटेन करत असेल, तर अशा संघांना आपल्या पर्समधील ४० ते ४५ टक्के इतकाच पैसा वापरता येणार आहे. आता रिटेन्शनच्या प्रक्रियेमुळे जवळपास ८ संघ आपल्याकडील महत्वाचे खेळाडू सोबत ठेवतील. यंदाच्या आयपीएलमध्ये आणखी दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये दोन ते तीन खेळाडू ठेवण्याचा पर्याय या आठ टीमला मिळणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला प्रत्येक फ्रॅंचायसीकडून नव्या टीमची घोषणा होणार आहे. त्यामुळे या संघांच्या घोषणेनंतरच संपुर्ण चित्र स्पष्ट होईल.

चेन्नईतून कोण रिटेन होणार ?

चेन्नईतून आगामी आयपीएल सामन्यांसाठी कर्णधार महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड या तिघांना संधी मिळू शकते. तर परदेशी खेळाडू म्हणून ब्रावोला संधी मिळू शकते. यापुढच्या कालावधीतील सामना खेळण्याच्या निमित्ताने सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने संकेत दिले होते. यापुढच्या कालावधीत ऑक्शन प्रक्रिया आणि रिटेन्शनची नियमावली या गोष्टींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे भविष्यातील चेन्नई सुपर किंग्जची टीम निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही धोनीने स्पष्ट केले होते. त्यामुळेच धोनीला सीएसके रिटेन करणार हे निश्चित आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : माझ्या शेवटच्या मॅचला येणार ? धोनीने सांगितले फेअरवेलचे ठिकाण

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -