घर क्रीडा बिर्याणीवर इडली पडणार का भारी?

बिर्याणीवर इडली पडणार का भारी?

Subscribe

आज हैदराबाद-चेन्नई भि़डणार!

आयपीएल प्ले ऑफच्या लढतींना आजपासून सुरुवात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर लढतीत चेन्नई सुपरकिंग व सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार आहेत. तीन वेळा विजेतेपदावर नाव कोरलेला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात आठव्यांदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी सज्ज झाला आहे.

- Advertisement -

CSK-vs-SRH
(फोटो प्रातिनिधिक आहे)

दोन दिग्गजांमध्ये काँटे की टक्कर!

- Advertisement -

आयपीएल गुणतालिकेत हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही माजी विजेत्यांच्या खात्यावर प्रत्येकी १८ गुण जमा असून थेट अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी अटीतटीचा सामना होणार. या संघात महेंद्र सिंग धोनी आणि केन विल्यमसन आमने-सामने खेळणार आहेत. त्यामुळे आज मुंबईमधील क्रिकेटरसिकांना थरारक लढतींची अनुभूती मिळणार आहे.

david-warner ipl
(फोटो प्रातिनिधिक आहे)

सनरायझर्स हैदराबाद संघ २०१६ची पुनरावृत्ती करणार?

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद संघाने २०१६ साली आयपीएलच्या जेतेपदावर शिका मारला होता. त्याचप्रमाणे आता देखील केन विल्यमसनच्या नेतृत्वात हा संघ त्या सालची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला असेल यात काही शंकाच नाही. या संघातील मंडळी आज आपला विजय होण्यासाठी जिवाचे रान करणार आहेत.

ambati-rayudu
(फोटो प्रातिनिधिक आहे)

रायुडूकडे सर्वांचं लक्ष

चेन्नईच्या फलंदाजीची मदार अंबाती रायुडूवर असणार आहे. त्याने यंदाच्या हंगामात एकूण ५८६ धावा केल्या आहेत. मात्र, चेन्नईची फलंदाजी एखाद-दुसऱ्या फलंदाजावर अवलंबून नाही. शेन वॉटसनने १३ सामन्यांमध्ये ४३८ धावा केल्या आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना हे दोघेसुद्धा सातत्यपूर्ण फलंदाजीने संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावत आहेत.

संघ

चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ डय़ू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, दीपक चहर, के. ए. आसिफ, कनिश सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शोरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, शिट्झ शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्नोई, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, एन. अ‍ॅगेडीसान, डेव्हिड विली.

सनरायझर्स हैदराबाद

केन विल्यम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसूफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थम्पी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपूल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अगरवाल, अ‍ॅलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशिद खान, शकिब अल हसन, मोहम्मद नबी, ख्रिस जॉर्डन.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -