घरक्रीडाकमिन्स जगातील सर्वोत्तम गोलंदाज - पेन

कमिन्स जगातील सर्वोत्तम गोलंदाज – पेन

Subscribe

पॅट कमिन्स हा सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे विधान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने केले. कमिन्सने मागील काही वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, नेथन लायन असे गोलंदाज असताना कमिन्स ऑस्ट्रेलियन संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातो. यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणार्‍या गोलंदाजांच्या यादीत कमिन्स अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ११ सामन्यांच्या २१ डावांत ५४ गडी बाद केले आहेत. त्याला गुरुवारपासून होणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत आणखी विकेट्स घेण्याची संधी मिळणार आहे.

कमिन्स सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याची मागील काही काळातील आकडेवारी हे सिद्ध करते. केवळ एक मालिका, एक किंवा दोन कसोटी सामने नाही, तर त्याने प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सामन्यागणिक त्याच्या खेळात सुधारणा होत आहे. पूर्वी तो फलंदाजांना अडचणीत टाकण्यासाठी वेगाचा वापर करायचा. मात्र, आता तो सतत १४० किमीपेक्षा जास्तच्या वेगाने गोलंदाजी करत नाही. त्याने आपल्या गोलंदाजीत विविधता आणली आहे, असे कर्णधार पेन म्हणाला.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या खेळाडू लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल १५.५ कोटी रुपयांत त्याला खरेदी केले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -