घरक्रीडाजागतिक कसोटी स्पर्धेबाबत उत्सुकता!

जागतिक कसोटी स्पर्धेबाबत उत्सुकता!

Subscribe

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रियता यावी यासाठी आयसीसी जागतिक स्पर्धा सुरू करण्याचा गेली काही वर्षे प्रयत्न करत होती. मात्र, आता अखेर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील अ‍ॅशेस मालिकेपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. पुढील २ वर्षे चालणार्‍या या जागतिक स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे अव्वल नऊ संघ सहभागी होणार आहेत.

७१ सामने आणि एकूण २७ कसोटी मालिकांनंतर अव्वल दोन संघ जून २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात खेळतील. कसोटी हा अजूनही क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि सर्वात आव्हानात्मक प्रकार असल्यामुळे सर्व खेळाडू या जागतिक स्पर्धेसाठी उत्सुक आहेत, असे विधान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिमी अँडरसन यांनी केले.

- Advertisement -

जागतिक स्पर्धेबाबत विराट म्हणाला, आम्ही आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहोत. सर्वच खेळाडू या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत, कारण या स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटला वेगळे महत्त्व मिळणार आहे. कसोटी हा क्रिकेटचा सर्वात आव्हानात्मक प्रकार आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यास खूप समाधान मिळते. भारतीय संघाने कसोटीत मागील काही वर्षांत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि आम्हाला ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे, असे मला वाटते.

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स (५७५) मिळवणारा जेम्स अँडरसनने या स्पर्धेबाबत सांगितले, कसोटी हा क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार आहे आणि खेळाडूंना यात सर्वोत्तम कामगिरी केल्यावर सर्वात जास्त आनंद मिळतो. आयसीसीचा या स्पर्धेमागचा विचार खूप चांगला आहे. जागतिक स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचा फायदाच होणार आहे. या स्पर्धेमुळे प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -