कूकच्या महानतेसाठी शब्द नाहीत !

इंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. त्याच्या या निर्णयामुळे अनेक आजी-माजी खेळाडूंनी खेळाडूंनी त्याला त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि त्याच्या पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Alastair Cook England great to retires from international cricket
सौजन्य - Essentially Sports

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर अॅलिस्टर कूक निवृत्त होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कूक हा इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन आहे. त्याने निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा सोमवारी केली. त्याने ही घोषणा केल्यानंतर अनेक क्रिकेटर्सनी त्याला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहे.

कूकच्या महानतेसाठी शब्द कमी पडतील – इंग्लंडचा बॉलर स्टुअर्ट ब्रॉड

तुझ्या ‘ दुसऱ्या इनिंग ‘ साठी शुभेच्छा – सचिन तेंडुलकर

इंग्लंडसाठी कोणत्याही खेळाडूने कूक एवढे योगदान दिलेले नाही – इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन 


कूकच्या पदार्पणात कळले होते की त्याच्यात काहीतरी खास आहे – व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

तुझ्याबरोबर खेळायला मिळाले हे माझे भाग्यचं – इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेरस्टोव