घरक्रीडालवप्रीत सिंहने भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक

लवप्रीत सिंहने भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक

Subscribe

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा आज सहावा दिवस आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी दमदार खेळी केली आहे. अशातच भारताच्या लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात (Lovepreet Singh) कांस्यपदक पटकावले आहे.

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा आज सहावा दिवस आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी दमदार खेळी केली आहे. अशातच भारताच्या लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात (Lovepreet Singh) कांस्यपदक पटकावले आहे. लवप्रीतच्या पटकावलेल्या रौप्यपदकामुळे भारताची राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेमधील पदकसंख्या 14 वर पोहचली आहे. (Cwg 2022 lovepreet singh weightlifting win bronze medal)

लवप्रीत सिंहने स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असे एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 14 पदक जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे.

- Advertisement -

वेटलिफ्टिंगच्या पुरूषांच्या 109 किलो ग्राम वजनी गटात लवप्रीत सिंहने उत्कृष्ट कामगिरी केली. लवप्रीत याने स्नेचच्या पहिल्या प्रयत्नात 157 किलो ग्राम वजन उचलले. त्यानंतर, दुसऱ्या प्रयत्नात 161 आणि तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो वजन उचलले. याशिवाय, क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात 185 किलो ग्राम वजन उचलले. तसेच, दुसऱ्या प्रयत्नात 189 आणि तिसऱ्या प्रयत्नात 192 किलोग्राम उजन उचलले.

लवप्रीत सिंह भारतीय नौदलात कार्यरत आहे. तो पंजाबमधील अमृतसर येथे राहणारा रहिवाशी आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्याने मोठा कारनामा करुन दाखवला असून, लवप्रीत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपल्या इवेंटदरम्यान सिद्धू मुसेवाला सारख सेलिब्रेशन करताना दिसला.

- Advertisement -

खेळाडूंची यादी

  • सुवर्णपदक – मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.
  • रौप्यपदक – संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ.
  • कांस्यपदक – गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह.

हेही वाचा –

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -