Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा भारताला मोठा धक्का, राष्ट्रकुल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

भारताला मोठा धक्का, राष्ट्रकुल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

Subscribe

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा काही तासांवरच येऊन ठेपली आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली असून भारताला मोठा धक्का बसलाय. या दोन खेळाडूंची नावं मात्र बीसीसीआयने सांगितलेली नाहीयेत. भारतीय संघ रविवारी सकाळी बर्मिंगहॅमला दाखल झाला आहे. आता संघ या दोन खेळाडूंविनाच स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. तसेच हा सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघाची दुसरी लढत ३१ जुलै रोजी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. तर तिसरी लढत बार्बाडोसविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतील सर्व लढती एजबॅस्टन येथे होणार आहे. ६ ऑगस्टला पहिला आणि दुसरा उपांत्य सामना खेळवण्यात येणार आहे. त्याचसोबतच ७ ऑगस्टला कांस्यपदकाची लढत होणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ३२२ सदस्य भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) या संघात २१५ खेळाडूंचा समावेश केला आहे, तर १०७ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी असणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. सध्या कोरोना झालेल्या खेळाडूंना पाच दिवस विलगीकरणात ठेवण्यात येते आणि त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेण्यात येते. या चाचणीमध्ये जर खेळाडू कोरोना निगेटीव्ह सापडले तर त्यांची फिटनेस चाचणी घेण्यात येते. या चाचणीमध्ये पास झाल्यावरच त्यांना संघात दाखल करण्यात येऊ शकते.


- Advertisement -

हेही वाचा : वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -