घरक्रीडा"दादा" झळकणार बॉलीवूड पडद्यावर, गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

“दादा” झळकणार बॉलीवूड पडद्यावर, गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

Subscribe

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. गांगुली ने आपल्या ऑफिशियल ट्वीटर अकाउंटवर त्याच्या बायोपिक बद्दल घोषणा करत चाहत्यांना आनंदाची भेट दिली आहे, तसेच लव फिल्म्सने देखील भारतीय क्रिकेटचा तारा सौरव गांगुली यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. यापूर्वी देखील एका मुलाखतीत गांगुलीने त्याच्या बायोपिकचे पुष्टीकरण केलं आहे, परंतु यावेळी त्यांनी ट्विट करून या बातमीवर पूर्णपणे शिक्कामोर्तब केला आहे. आपल्या बायोपिकची घोषणा करताना ते म्हणाले की, लवकरच त्यांची कथा मोठ्या पडद्यावर जिवंत होईल.

सौरव गांगुली, ज्यांना दादा म्हणून ओळखले जाते, जे निर्विवादपणे भारतातील सर्वात यशस्वी आणि विवादास्पद क्रिकेट कर्णधारांपैकी एक राहिले आहेत. क्रिकेटसाठी धडधाडणाऱ्या सर्व भारतीयांच्या हृदयात त्यांच्यासाठी एक खास जागा निश्चितच आहे.

- Advertisement -

सौरव गांगुलीने ट्विट करत म्हंटले , “क्रिकेट हे माझे आयुष्य आहे. यामुळे मला माझे डोके उंच ठेवून पुढे जाण्याचा आत्मविश्वास आणि क्षमता मिळाली. एक प्रवास जिवंत करण्यासाठी लव फिल्म्स माझ्या जीवन प्रवासात एक बायोपिक तयार करेल आणि मोठ्या पडद्यावर ते जिवंत करेल याचा आनंद वाटतो. ” त्याचवेळी लव रंजन म्हणाले की, लव फिल्म्स कुटुंबात दादा असणे हा सन्मान आहे! आम्हाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवल्याबद्दल आणि जगा समोर संदेश दिल्याबद्दल धन्यवाद.

- Advertisement -

९०च्या दशकातील क्रिकेटर ते सध्याच्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होण्यापर्यंत, गांगुली यांना अंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्ससोबत त्यांना अनेक विवादास्पद भूमिकेसाठी देखील तितकेच ओळखले जाते. त्यांचे जीवन भारतीय क्रिकेटमधील सर्वात रोमहर्षक नाट्य असून ते मोठ्या पडद्यावर पाहणे दर्शकांसाठी तितकेच रोचक असेल. या बायोपिकचे निर्माण लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहेत.

बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या चित्रपटाची निर्मिती लव फिल्म्स करणार आहे आणि लव रंजन दिग्दर्शित करू शकतात. गांगुलींच्या आधी महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, बबिता फोगाट, मिल्खा सिंग आणि सायना नेहवाल सारख्या अनेक खेळाडूंचे बायोपिक बनवले गेले आहेत. आता क्रीडा व्यक्तिमत्त्वांमध्ये पुढील बायोपिकचा नंबर सौरव गांगुलीचा आहे. मात्र, या चित्रपटात सौरव गांगुलीची भूमिका कोण साकारणार आहे. हे अद्याप उघड झाले नाही, परंतु एका मुलाखतीत गांगुलीने रणबीर कपूरला त्याचे पात्र साकारण्यासाठी एक मुख्य पर्याय म्हंटले होते.

सौरव गांगुलीने ११३ कसोटी खेळून भारतासाठी ७,२१२ धावा केल्या आहेत. त्याने ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११,३६३ धावा केल्यात. तो भारतासाठी सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक होता, त्याने २००३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि भारताला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक उंचीवर पोहचवले आहे.

लव फिल्म्सने ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘दे दे प्यार दे’, ‘मलंग’ आणि ‘छलांग’ सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली असून त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत लव रंजन यांच्या दिग्दर्शनात बनणारी ‘कुत्ते’ आणि ‘उफ्फ’ यांचा चित्रपटांचा समावेश आहे.


हेही वाचा : तर AUS VS AFG पहिली कसोटी रद्द करू, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची तालिबांन्यांना तंबी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -