घरक्रीडाDale Steyn Retirement : साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून...

Dale Steyn Retirement : साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला संन्यास

Subscribe

१२५ वन-डे आणि ४७ आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या डेल स्टेन यांनी २००४ मध्ये टेस्ट सामन्यात डेब्यू केलं होते.

साऊथ आफ्रेकाचा वेगवानग गोलंदाज डेल स्टेन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. डेल स्टेन याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची माहिती दिली आहे. डेल स्टेनंने आपल्या गोलंदाजीमुळे अनेकांची मनं जिंकली होती. आफ्रिकेतील दिग्गज क्रिकेट खेळाडूंमध्ये डेल स्टेनचे नाव घेण्यात येते. डेल स्टेननं यंदा आयपीएलमधूनही आपले नाव मागे घेतलं होते. विराट कोहलीच्या रॉयल चैलेंजर्स बँगलोर या क्रिकेट संघातून खेळत होता. मला अधिक आवडीच्या असलेल्या खेळातून मी संन्यास घेत आहे. सांगण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी आहेत असे म्हणत डेल स्टेनं सर्व साथीदार आणि संघातील खेळाडूंसह चाहत्यांचे आभार मानले आहेत.

डेल स्टेन याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची माहिती दिली आहे. डेल स्टेन याने म्हटलं आहे की, आज मी क्रिकेटमधून संन्यास घेत आहे. जो की माझा सर्वाधिक आवडीचा खेळ आहे. सागण्यासाठी अनेक आठवणी आहेत. संघातील साथीदारांपासून, पत्रकार आणि चाहत्यांचे आभार मानत डेल स्टेनने म्हटलं आहे की, ट्रेनिंग, मॅच, ट्रॅवल, विजय, पराजय, आनंद असा २० वर्षांचा प्रवास पुर्ण झाला असून सर्वांचे आभार असे डेल स्टेन याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

१२५ वन-डे आणि ४७ आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या डेल स्टेन यांनी २००४ मध्ये टेस्ट सामन्यात डेब्यू केलं होते. दक्षिण आफ्रिकेसाठी स्टेनने ९३ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमधून डेलने २०१९ मध्येच संन्यास घेतला होता आणि मागील बऱ्याच महिन्यापासून डेल क्रिकेटपासून दुर होता. डेलने आपली शेवटची मॅच श्रीलंका विरोधात मार्च २०१९ मध्ये खेळली होती. तसेच या गोलंदाजाने टेस्ट मॅचमध्ये ४३९, वन-डेमध्ये १९६ आणि टी-२- आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ६४ विकेट घेतल्या आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -