विराट आणि जडेजाच्या डान्सवर शाहरुख म्हणतो; माझ्यापेक्षा…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. 21 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक सुपरहिट चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटासोबतच अनेकजण चित्रपटातील बेशरम रंग आणि झूमे जो पठाण गाण्यावर देखील जबरदस्त डान्स करताना दिसून येत असतात. सोशल मीडियावर या गाण्यांचे प्रचंड रिल्स व्हायरल होत असतात. अशातच भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने देखील झूमे जो पठाण गाण्यावर डान्स केला आहे. जो सध्या व्हायरल होतोय.

विराट कोहली आणि रवींद्र जडेजाच्या डान्सवर शाहरुख खानने दिली प्रतिक्रिया

सध्या शाहरुख खान ट्वीटरवर खूप सक्रिय असतो. AskSRK मध्ये, त्याला चाहते न घाबरता अनेक प्रश्न विचारतात. शाहरुखही या प्रश्नांवर चाहत्यांना प्रतिक्रिया देत असतो. नुकताच एका चाहत्याने विराट कोहली आणि रवींद्र जडेजाचा डान्स शेअर करत शाहरुखला मेन्शन केला आहे. यावर प्रतिक्रिया देत शाहरुखने लिहिलंय की, “या दोघांनी माझ्यापेक्षा चांगला डान्स केला आहे, मला विराट आणि जडेजाकडून हे शिकायला हवं” सध्या शाहरुखचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘पठाण’ने कमावले इतके कोटी

शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच कोट्यावधींची कमाई करण्यास सुरुवात केली आहे. आता जवळपास 21 दिवसानंतरही ‘पठाण’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 364.15 कोटी कमावले असून दुसऱ्या आठवड्यात 94.15 कोटी कमावले. शिवाय 21 व्या दिवशी चित्रपटाने 4.50 कोटी कमावले आहेत. त्यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने एकूण 493.65 कोटी कमावले आहेत. शिवाय जगभरातून या चित्रपटाने आत्तापर्यंत 950 कोटी कमावले आहेत. लवकर हा आकडा 1000 कोटीपर्यंत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 


हेही वाचा :

हार्दिक-नताशा पुन्हा अडकले विवाहबंधनात; फोटो व्हायरल