घरक्रीडाIPL 2022: आयपीएलच सर्वोत्तम लीग, PSL बाबत दानिश कनेरियाचं मोठं वक्तव्य

IPL 2022: आयपीएलच सर्वोत्तम लीग, PSL बाबत दानिश कनेरियाचं मोठं वक्तव्य

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वोत्तम लीग मानली जाते. पण अनेकदा त्याची तुलना पाकिस्तान सुपर लीगसोबत सुद्धा केली जाते. पाकिस्तान सुपर लीगबाबत नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीची कारणं दिली जातात. दरम्यान, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने आयपीएलबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

आयपीएल इतर लीगपेक्षा एक प्रोफेशनल लीग आहे. ज्यामुळे अनेक भारतीय क्रिकेटरांची कारकीर्द ही लीगच्या माध्यमातून घडली आहेत. मात्र, पाकिस्तान सुपर लीगने आतापर्यंत पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी काहीही असं विशेष केलेलं नाहीये, असं फरकीपटू दानिश कनेरिया म्हणाला.

- Advertisement -

आयपीएल हे एक प्रोफेशनल पद्धतीचं लीग आहे. ज्या प्रत्येक हंगमात नवीन काहीतरी घडत आहेत. याव्यतिरिक्त पाकिस्तान क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तान सुपर लीगने आतापर्यंत आमच्यासाठी काहीही असं विषेश केलेलं नाहीये. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जी पद्धत अवलंबली आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे, असं कनेरिया म्हणाला.

आयपीएलनंतर पीएसएलच्या हंगामाला सुरूवात करण्यात आली होती. २०१६ मध्ये पाकिस्तान सुपर लीगला सुरूवात झाली. यामध्ये ६ संघांचा समावेश करण्यात आला होता. आता पाकिस्तान सुपर लीग सुद्धा आयपीएलसारखी लिलाव प्रणाली आणू शकते.

- Advertisement -

टी-२० संघात कोणत्याही प्रकारचा संघ फेव्हरेट नसतो. परंतु चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ अशा प्रकारचे संघ आहेत की, जे अगदी योग्य आणि गाजलेले असे संघ आहेत. यावेळी, दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ इतर संघांवर भारी पडण्याची शक्यता आहे. आयपीएल ही एक टूर्नामेंट असून प्रत्येक खेळाडूला हे लीग खेळण्यास रस आहे, असं कनेरिया म्हणाला.

२००८ साली आयपीएलला सुरूवात झाली. त्यावेळी ८ संघांचा आयपीएलमध्ये समावेश होता. परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये आता एकूण दहा संघांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आज गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने-सामने भिडणार आहेत.


हेही वाचा : गृहमंत्री आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, गृहमंत्र्यांनी केला खुलासा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -