घरक्रीडाIPL 2021 : पुन्हा स्टेडिअमवर कदाचित दिसणार नाही, वॉर्नरचा मोठा खुलासा

IPL 2021 : पुन्हा स्टेडिअमवर कदाचित दिसणार नाही, वॉर्नरचा मोठा खुलासा

Subscribe

सनरायझर्स हैद्राबादचा ओपनिंग बॅट्समन सध्या खराब फॉर्मचा सामना करतोय. या फॉर्मच्या कारणामुळेच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये वगळण्यात आले आहे. त्यादरम्यानच डेव्हिड वॉर्नरने एक धक्कादायक असे विधान केले आहे. मी पुन्हा स्टेडिअमवर दिसणार नसल्याची शक्यता डेव्हिड वॉर्नरने बोलून दाखवली आहे. सनरायझर्स हैद्राबादकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता मावळल्यानेच डेव्हिड वॉर्नरने ही प्रतिक्रिया दिली आहे. (David warner clarified wont be on stadium again for SRH ipl 2021)

वॉर्नरला राजस्थान रॉयल्सविरोधात सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात डच्चू देण्यात आला होता. या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने ७ विकेट्सने विजय मिळवला. आतापर्यंत सनरायझर्सने दहा सामन्यात केवळ दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे सनरायझर्सची प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची कोणतीही शक्यता नाही. वॉर्नरची टीम डगआऊटमधील अनुपस्थिती ही प्रेक्षकांकडून चुकलेली नाही. फॅन्सने त्या अनुपस्थितीबद्दल इन्स्टाग्रामवर आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

- Advertisement -

वॉर्नरनेही फॅन्सच्या प्रतिक्रियांना उत्तर देत स्पष्ट केले आहे की, यापुढे मैदानात कदाचित दिसणार नाही, पण संघाला सपोर्ट मात्र करत राहीन. वॉर्नरने यंदाच्या सिझनमध्ये २४.३७ सरासरीने १८१ धावा केल्या आहेत. यंदाची आयपीएलची कामगिरी ही सर्वात किमान अशी कामगिरी राहिली आहे. सध्याच्या ३४ वर्षीय वॉर्नरने सनरायझर्स हैद्राबाद ही फ्रॅंचायसीसोबत २०१६ मध्ये खेळायला सुरूवात केली होती. डेव्हिड वॉर्नरला २०१८ मध्ये बॉल टॅम्परिंग वादानंतर कर्णधार पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर २०२० मध्ये वॉर्नरकडे पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व आले.

यंदा मात्र वर्षाच्या सुरूवातीलाच डेव्हिड वॉर्नरची कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्यात आली. टीमचा खराब फॉर्म आणि संघाचे संचालक टॉम मूडी आणि मुख्य कोच ट्रेवर बेलिस यांच्यासोबतच्या वादामुळे त्याची कर्णधार पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली.

- Advertisement -

आम्ही यंदा फायनल्सपर्यंत पोहचणार नाही, म्हणूनच आम्ही निर्णय घेतला आहे की, तरूण खेळाडूंना संघात स्थान देऊ. वॉर्नर त्याच्या हॉटेल रूमवर थांबत असल्याने त्याबाबतचा प्रश्न करण्यात आला होता. तेव्हा संघ व्यवस्थापनाकडून हे उत्तर देण्यात आले. आयपीएलच्या सूत्रानुसार यंदाच्या हंगामाअखेरीस डेव्हिड वॉर्नरला फ्रॅंचायसीकडून मुक्त करण्यात येईल असे कळते. त्यानंतर वॉर्नर पुन्हा एकदा ऑक्शन पूलसाठी उपलब्ध असेल असे कळते.


हेही वाचा – IPL 2021 : डेविड वॉर्नरची हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी! विल्यमसन करणार नेतृत्व 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -