घरक्रीडाAUS vs ENG Test : ॲशेस मालिकेपूर्वी इंग्लंडच्या गोलंदाजाला डेविड वॉर्नरर्ची भीती;...

AUS vs ENG Test : ॲशेस मालिकेपूर्वी इंग्लंडच्या गोलंदाजाला डेविड वॉर्नरर्ची भीती; म्हणाला…

Subscribe

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील लोकप्रिय ॲशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील लोकप्रिय ॲशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सांगितले की ऑस्ट्र्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरच्या बाबतीत त्याच्या मनात खूप भीती आहे. अँडरसनने म्हंटले की, “वॉर्नरकडे अजूनही इंग्ंलडसाठी खूप काही आहे आणि आम्ही त्याला हलक्यात घेऊ शकत नाही”. लक्षणीय बाब म्हणजे टी-२० विश्वचषकात वॉर्नरने शानदार प्रदर्शन केले होते. तो त्याच्या जुन्या लयनुसार खेळताना पाहून विरोधी गोलंदाजांच्या मनात त्याच्या बाबतीत चांगलीच भीती पसरली आहे.

“ऑस्ट्रेलियाच्या संघाचा त्यांच्या धरतीवर चांगला विक्रम आहे. याबाबत आम्हाला कल्पना आहे की वॉर्नर वेगळा खेळाडू आहे. त्याचा आम्ही २०१९ मध्ये उन्हाळ्यात झालेल्या सामन्यात सामना केला होता. आम्ही वॉर्नर सोबत खूप सामने खेळलो आहेत”. असे अँडरसनने आणखी सांगितले.

- Advertisement -

२०१९ मध्ये वॉर्नरकडून निराशाजनक खेळी

सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरचे २०१९ मधील प्रदर्शन निराशाजनक राहिले होते. त्यावेळी त्याने ९.५ च्या सरासरीने फक्त ९५ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने त्याल ७ वेळा बाद केले होते. वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ७३११ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने त्याच्या ४५ कसोटी सामन्यांत ६३.२० च्या सरासरीने १८ शतक केले आहेत. ज्यात त्याच्या वैयक्तिक सर्वाधिक ३३५ धावांची नोंद आहे.

- Advertisement -

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपलने देखील इशारा दिला की इंग्लंडचा संघ वॉर्नरला कधीही हलक्यात घेऊ शकत नाही. त्याने अधिक म्हंटले की, ” कित्येत जणांनी त्याच्यावर टि-२० विश्वचषकापूर्वी लिहले होते. की तो क्रमवारीत किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी. वॉर्नर ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा किताब जिंकून देण्यासाठी फॉर्ममध्ये आला आहे असे त्याने अधिक म्हंटले.


हे ही वाचा: http://Football : रोनाल्डो ८०० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू; सर्वाधिक गोल रियल मॅड्रीडसाठी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -