घरक्रीडामालदीवमधील बारमध्ये डेविड वॉर्नरची मायकल स्लेटरसोबत हाणामारी, काय आहे प्रकरण?

मालदीवमधील बारमध्ये डेविड वॉर्नरची मायकल स्लेटरसोबत हाणामारी, काय आहे प्रकरण?

Subscribe

बारमध्ये हाणामारी झाल्याच्या वृत्ताला डेविड वॉर्नरने फेटाळले

आयपीएलमधील सनराईजर्स हैदराबादचा स्टार क्रिकेटपटू आणि सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर यांची समालोचक मायकल स्लेटरसोबत हाणामारी झाली आहे. मालदीवमधील एका बारमध्ये डेविड वॉर्नर आणि मायकल स्लेटर यांच्यात धक्काबुक्की झाल्याची बातमी पसरत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आयपीएल टीममध्ये काही खेळाडू कोरोनाबाधित आढळल्यामुळे आयपीएल १४ चा हंगाम रद्द करण्यात आला आहे. परंतु काही परदेशी खेळाडू मालदीवमध्ये थांबले असून तिथूनच ते मायदेशी परतणार आहेत. परंतु शनिवारी ऑस्ट्रेलिया खेळाडू डेविड वॉर्नर आणि आयपीएलमधील समालोचक मायकल स्लेटर यांच्यात धक्काबुक्की झाली आहे. परंतु या दोघांनीही त्यांच्यात असला कोणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे.

डेली टेलीग्राफने दिलेल्या माहितीनुसार मालदीवमधल्या ताज कोरल रिसॉर्टमध्ये खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यावेळी डेविड वॉर्नर आणि मायकल स्लेटर यांच्यात शाब्दिक वाद झाला हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली. डेविड वॉर्नरचे आयपीएलमधील खराब प्रदर्शनामुळे टीमच्या कर्णधारपदावरुन काढून टाकले तसेच यानंतर त्याला टीममधूनही बाहेर काढले. डेविड वॉर्नरच्या जागी न्यूझलंडच्या केन विल्यमसनला कर्णधार बनवण्यात आले होते. भारतातील बायोबबलमध्ये खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल हंगाम रद्द करण्यात आला आहे. परंतु मायकल स्लेटरने प्रतिक्रिया देताना वॉर्नरसोबत कोणताही वाद झाला नसल्याचे म्हटले आहे. डेवीड वॉर्नर आणि मी चांगले मित्र असून आमच्यात कोणताही वाद झाला नाही आणि असे काही होण्याची शक्यता नसल्याचे समालोचक मायकल स्लेटर याने म्हटले आहे.

- Advertisement -

डेविड वॉर्नरची प्रतिक्रिया

बारमध्ये हाणामारी झाल्याच्या वृत्ताला डेविड वॉर्नरने फेटाळले आहे. डेविड वॉर्नरने म्हटले आहे की, असे काही झालं नाही, मला माहित नाही की तुम्हाला अशी माहिती कुठून मिळते. तुम्ही इथे उपस्थित नाही तसेच तुम्हाला ठोस माहिती मिळाल्याशिवाय अशा प्रकारचे काही वृत्त छापू शकत नाही. आमच्यात असे काहीच झाले नसल्याचे डेविड वॉर्नरने म्हटले आहे. वॉर्नर आणि मायकल स्लेटर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत. आयपीएल रद्द झाल्यामुळे या खेळाडूंना गुरुवारी विशेष विमानाने मालदीवमध्ये नेण्यात आले आहेत. या विमानाचा खर्च भारतीय क्रिकेट बोर्डने केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -