डेव्हिड वॉर्नर पुन्हा फॉर्मात, शतकी खेळीनंतर झाला भावूक

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील अखरेचा आणि तिसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने तुफान फटकेबाजी करत शतकी खेळी केली. वॉर्नरने 103.92 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत शतक झळकावले. या शतकी खेळीनंतर वॉर्नर भावूक झाला. त्याने आपल्या हातातील ग्लोव्ह्ज एका छोट्या चाहत्याला भेट दिली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वॉर्नरने प्रदीर्घ काळानंतर आपल्या शतकाचा दुष्काळ संपवला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 106 धावांची शतकी खेळी खेळली. त्याने 1042 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावले आहे.

डेव्हिड वॉर्नरने इंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये 102 चेंडूत 106 धावांची खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियासाठी वनडेमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत वॉर्नर नंबर-2वर पोहोचला आहे. त्याने माजी दिग्गज मार्क वॉला मागे सोडले आहे.


हेही वाचा : भारतातून फरार असलेला झाकीर नाईक ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये करणार ‘इस्लामचा प्रचार’