घरक्रीडाDC vs CSK Live Update : दिल्लीच्या गोलंदाजांसमोर चेन्नईचं लोटांगण; चेन्नईचा सलग...

DC vs CSK Live Update : दिल्लीच्या गोलंदाजांसमोर चेन्नईचं लोटांगण; चेन्नईचा सलग दुसऱ्यांदा पराभव

Subscribe

आज आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध दिल्ली असा सामना होत आहे. 

दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला ४४ धावांनी हरवलं असून चेन्नई सलग दुसऱ्यांदा पराभव पत्कारावा लागला.


चेन्नईला पाचवा धक्का, डु प्लेसिस ४३ धावांवर बाद. चेन्नई – १२१/५, १८ षटक, धोनी (१३) आणि जडेजा (७)

- Advertisement -

चेन्नईला चौथा धक्का. केदार जाधव २६ धावांवर बाद. चेन्नई – ९८/४, प्लेसिस (४०)


१७६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन (१४) आणि मुरली विजय (१०) झटपट बाद झाले.

- Advertisement -

दिल्लीकडून पृथ्वी शॉ (६४), रिषभ पंत (नाबाद ३७), शिखर धवन (३५) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२६) यांनी चांगली फलंदाजी केली.


दिल्लीने २० षटकांत ३ बाद १७५ अशी धावसंख्या उभारली.


पृथ्वी शॉ ६४ धावांवर बाद झाला. त्याने या धावा ४३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या. त्याला पियुष चावलाने माघारी पाठवले.


शिखर धवनला ३५ धावांवर पियुष चावलाने पायचीत पकडत दिल्लीला पहिला झटका दिला.


दिल्लीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने अप्रतिम फलंदाजी करत ३५ चेंडूत अर्धशतक झळकावले.


दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी डावाची सावध सुरुवात केली. त्यामुळे ६ षटकांच्या पॉवर-प्लेनंतर दिल्लीची बिनबाद ३६ अशी धावसंख्या होती.


चेन्नईच्या संघात एक बदल; लुंगी इंगिडीच्या जागी जॉश हेझलवूड संघात. दिल्ली संघात दोन बदल; अमित मिश्रा आणि आवेश खानचा संघात समावेश.


या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय.


आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -