घरक्रीडाDC vs GT: दिल्ली सामन्यासाठी पंत मैदानावर परतणार! मात्र 'या' गोष्टीसाठी बीसीसीआयने...

DC vs GT: दिल्ली सामन्यासाठी पंत मैदानावर परतणार! मात्र ‘या’ गोष्टीसाठी बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सला फटकारले

Subscribe

नवी दिल्ली : आयपीएलच्या 16 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आज दिल्ली त्यांच्या घरच्या मैदानावर दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. लीगच्या 7 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सचा आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाची आज पुन्हा परीक्षा होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्समधून त्यांचा नियमित कर्णधार ऋषभ पंत या सामन्यात उपलब्ध असणार अशी मोठी बातमी समोर आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या दुसऱ्या सामन्यात त्यांचा नियमित कर्णधार ऋषभ पंत अरुण जेटली स्टेडियमवर उपस्थित असणार अशी माहीत समोर येत आहे. तो आजच्या सामन्यात आपल्या संघाला पाठिंबा देताना दिसू शकतो, मात्र त्याला संघाच्या डगआउटमध्ये जाण्यासाठी परवानगी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा विभागाची परवानगी आवश्यक आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

- Advertisement -

या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ऋषभ हा नेहमीच दिल्ली कॅपिटल्स संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या हंगामातील पहिल्या घरच्या मैदानावर उपलब्ध असण्याची दाट शक्यता आहे. तो संघ मालकाच्या सीटवर उपलब्ध असून त्याला बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा विभागाने परवानगी दिल्यास तो संघाच्या डगआउटमध्ये सुद्धा येऊ शकतो.

ऋषभ पंतचा अपघात
ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून बराच काळ लांब आहे. पंतच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रिषभ पंतची 17 नंबरची जर्सी डगआउटच्या छतावर टांगली होती आणि लिहिले होते की, ते नेहमी त्याच्याशी जोडलेले आहेत.

- Advertisement -

बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सला फटकारले
आयपीएलच्या सूत्राने सांगितले की, बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सला हे स्पष्ट केले आहे की, ऋषभ पंतच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. त्यामुळे असा प्रकार टाळायला हवा, असे बीसीसीआयने सांगितले आहे. बीसीसीआयने म्हटले की, ‘हे जरा जास्त झाले. रिषभ पंतची जर्सी लावण्याचा प्रकार दुर्दैवी घटना किंवा निवृत्तीच्या क्षणांसाठी राखून ठेवलेले असतात, मात्र यावेळी दोन्ही घटना नव्हत्या. ऋषभ प्रकृती सुधारत असून तो लवकरच बरा होईल. दिल्लीने हे चांगल्या मानसिकतेने केले असले तरी बीसीसीआयनेही असा प्रकार नम्रपणे न करण्याचा सल्ला दिला आहे.

खेळाडू पंतसाठी खास जर्सी घालतील
विशेष म्हणजे ऋषभ पंतची जर्सी डगआऊटमध्ये लावण्याची कल्पना मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांची होती. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ एक विशेष जर्सी घालून सामना खेळताना दिसतो. यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाचे सर्व खेळाडू पंतच्या क्रमांकाची जर्सी घालून खेळताना दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -